Nagpur : नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा दोन डॉक्टरांना चावा, बंदोबस्त न केल्यास डॅाक्टरांचा संपाचा इशारा

| Updated on: Aug 01, 2022 | 9:00 AM

दोन्ही डॅाक्टरांवर मेडीकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री दोन तासांत दोन डॅाक्टरांना मोकाट कुत्रे चावल्याने खळबळ उडाली होती. नागपूर मेडीकल परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस आहे.

Nagpur : नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा दोन डॉक्टरांना चावा, बंदोबस्त न केल्यास डॅाक्टरांचा संपाचा इशारा
नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा दोन डॉक्टरांना चावा, बंदोबस्त न केल्यास डॅाक्टरांचा संपाचा इशारा
Image Credit source: twitter
Follow us on

नागपूर – नागपूर (Nagpur) मेडीकलमध्ये दोन डॅाक्टरांना मोकाट कुत्र्यांनी (Dog) चावा घेतला आहे. त्यामुळे तिथल्या परिसरात कुत्र्यांची दहशत वाढली आहे. कारण काल रविवारी दोन तासात दोन डॉक्टरांना कुत्र्याने चावा घेतल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. दोन्ही डॉक्टरांवरती काहीवेळात वैद्यकीय उपचार घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. या आठवड्यातील कुत्रे चावण्याची ही चौथी घटना असल्याची माहिती तिथल्या डॉक्टरांनी (Doctor) दिली आहे. त्यामुळे तिथं कुत्र्यांना पालिकेकडून ताब्यात घेण्याची मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.

पालिका तिथल्या भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेण्याची शक्यता

नागपूर मेडीकल परिसरात मागच्या काही दिवसांपासून कुत्रे मोकाट फिरत असल्याची तक्रार तिथल्या डॉक्टरांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. वेळीचं दखल न घेतल्याने तिथल्या मोकाट कुत्र्यांनी आठवडाभरात चारवेळी तिथल्या डॉक्टरांना चावा घेतला आहे. त्यामुळे तिथं भटक्या कुत्र्यांची दहशत असल्याची चर्चा देखील आहे. डॉक्टर भीतीच्या सावटाखाली आहेत. डॉक्टरांनी तिथल्या परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त पालिकेकडून नाही केला तर संप करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज पालिका तिथल्या भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही डॅाक्टरांवर मेडीकल रुग्णालयात उपचार सुरू

दोन्ही डॅाक्टरांवर मेडीकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री दोन तासांत दोन डॅाक्टरांना मोकाट कुत्रे चावल्याने खळबळ उडाली होती. नागपूर मेडीकल परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस आहे. मेडीकल परिसरात मोकाट कुत्रे चालण्याची आठवडाभरातील चौथी घटना आहे. मोकाट कुत्र्यांमुळे डॅाक्टरांमध्ये भितीचं वातावरण आहे. महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास डॅाक्टरांचा संपाचा इशारा असल्याची माहिती तिथल्या डॉक्टरांनी दिली आहे.