नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागपूरमध्ये चालना मिळणार आहे. नागपुरात लसीकरणानं जोर पकडला आहे. आज नागपूर मनपाच्या केंद्रामध्ये कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर, “मिशन लसीकरण” अंतर्गत दोनशे वाहनांचे 20 ऑगस्ट रोजी होणार हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे.‘लसीकरण तुमच्या दारी’ मोहीमेअंतर्गत महापारेषणच्या ‘सीएसआर’ निधीमधून 200 वाहनांची खरेदी करण्यात आली असून विदर्भ सहायता सोसायटीनं योगदान दिलं आहे.
राज्य शासनानं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचा पुरवठा केल्यानं नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार आहे. 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नागपूर महापालिकेला राज्य सरकारनं कोवॅक्सिन लसीचा पुरवठा केल्यानं लसीकरणाला गती मिळणार असून 18वर्षांवरील व 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध झालेला आहे. नागपूर महापालिकेनं पात्र नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, असं म्हटलं आहे.
“मिशन लसीकरण” अंतर्गत दोनशे वाहनांचे 20 ऑगस्ट रोजी होणार हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे.‘लसीकरण तुमच्या दारी’ मोहीमेअंतर्गत महापारेषणच्या ‘सीएसआर’ निधीमधून 200 वाहनांची खरेदी करण्यात आली असून विदर्भ सहायता सोसायटीनं योगदान दिलं आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागपूर व अमरावती विभागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी तर्फे सामाजिक दायित्व अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. यातून खरेदी करण्यात आलेल्या दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण शुक्रवार, दिनांक 20 ऑगस्ट रोजी होत आहे.
इतर बातम्या:
Nagpur Municipal Corporation appeal people to take Covishield and Covaxin vaccine jab