नागपूर: महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसनं आता राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं दिसतंय. नागपूर मनपा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने नागपुरात अंतर्गत सर्व्हे सुरु केला आहे. समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे संकेत आहेत. ‘पाच वर्षात केलेल्या कामाबाबत करणार सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. नागपुरातील काँग्रेस नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येतेय. काँग्रेसच्यावतीनं शहरातील 151 प्रभागात उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. ‘निवडूण येणाऱ्या उमेदवारांनाच दिलं जाणार निवडणुकीचं तिकीट देण्यात येणार आहे. नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आलीय. या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने जोरात तयारी सुरु केलीय. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी नागपुरात काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे सुरु झालाय. या सर्व्हेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत काँग्रेस नगरसेवकांनी केलेल्या कामाची माहिती घेणे, नगरसेवकांच्या कामगिरीबाबत मतदारांचं काय मत आहे, शिवाय संभाव्य उमेदवाराबाबत चाचपणी करण्याचं काम पक्षाकडून केलं जातंय. ‘गेल्या पाच वर्षात समाधानकारक कामगीरी नसलेल्या नगरसेवकांना पक्ष घरचा रस्ता दाखवणार असून, या सर्वेच्या माध्यमातून काँग्रेस नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड तयार होतंय, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली आहे.
काँग्रेस गेल्या 15 वर्षांपासून नागपूरमध्ये सत्तेबाहेर आहे. नागपूर महापालिकेचे सध्या 151 प्रभाग आहेत. काँग्रेसनं त्यामुळे शहरातील 151 प्रभागात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे’ अशी माहिती नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलीय. नागपूरात काँग्रेस गेल्या 15 वर्षांपासून सत्तेपासुन दूर आहे, त्यामुळे आगामी मनपा निवडणूकीत सत्ता मिळावी, म्हणून काँग्रेसने तयारी सुरु केलीय.
एकूण सदस्य: 151
भाजप :108
काँग्रेस: 29
बसपा : 10
इतर :04
महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग पद्धती बाद झाल्याने, आता नागपूर मनपाच्या निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. निवडणूक एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार असल्याने सलग 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला यावेळी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. तर, दुसरीकडे प्रभाग पद्धतीत तग धरू न शकणाऱ्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या या नव्या पद्धतीने आशा पल्लवीत झाल्यात. नव्या प्रभाग पद्धतीत भाजप बाजी मारणाक की काँग्रेससह विरोधी पक्ष बाजी पलटवणार हे पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या:
पुणे, पिंपरी चिंचवडसाठी आता ‘एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत’, महापालिकेत राजकीय समीकरणं बदलणार?
जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सत्ताधारी एकवटले; रोहित पवार म्हणाले..
आखाडा नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा, एक प्रभाग पद्धतीचा कुणाला फायदा कुणाला तोटा?
Nagpur Municipal Corporation Congress started survey and prepare report card of corporators before election of nmc