नागपूरः नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे गेल्या 15 वर्षांपासून सिद्ध होतं आहे, कारण नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता कायमच राहिली आहे. मागील 2017 मधील निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेत 151 जागांपैकी 108 जागांवर भाजपने विजय (BJP Win) मिळवला होता. तर काँग्रेसला 29 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला मात्र या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Nagpur municipal corporation election) फक्त 2 जागांवर विजय मिळवता आला आहे, आणि तेवढ्यावरच समाधान मानावे लागले होते. बहुजन समाज पार्टीला (BSP) मात्र शिवसेनेपेक्षा जादा जागा मिळाल्या होत्या, त्या निवडणुकीत 10 जागांवर बसपानं आपले उमेदवार निवडून आणले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजप सोडून सगळ्याच राजकीय पक्षांना येथे काटेटक्कर द्यावी लागणार आहे, तीसुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर. यावर्षी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळं चित्र दिसण्याची शक्यता आहे मात्र नागपुरात राज्यातील सत्तांतराचा काही परिणाम होईल असं वाटत नाही.
आणि परिणाम झालाच तर मात्र सकारात्मकच परिणाम होऊन देवेंद्र फडणवीसांच्याच भाजपला आणखी जागा मिळतील अशी शंकाही व्यक्त केली जाते आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 मध्ये जे चार नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामध्ये सर्वच्या सर्व उमेदवार हे भाजपचेच निवडून आले आहेत.त्यामुळे यंदाही शिवसेना, राष्ट्रवादी, आणि बहुजन समाज पार्टीला या प्रभागामध्ये काही जागा मिळणार की नाही की भाजपचाच्याच कमळावर लोकं शिक्का मारणार हे आता याचे चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. भाजपचे अनिल शौकीलाल गेंडरे, सरिता ईश्वर कावरे, चेतन राजू टांक, प्रदीप वसंतराव पोहाणे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून भाजपला विजयी केले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचच कमळ फुलणार की सत्तांतराचा परिणाम होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्वादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
आगामी निवडणुकीत आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग क्र. 24 मध्ये अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले असून उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्वादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 ची व्याप्ती ही चिमाबाई पेठ,कुऱ्हाडवर मोहल्ला, भानखेडा, टीमकी, नांदबाची डोब, चांदेकर मोहल्ला, तकीया, गांजाखेत, कोसारकर मोहल्ला, हंसापूरी मस्कासाथ, तेलीपूरा, परवारपूरा, ढेमके मोहल्ला, बापूराव गल्ली, जागनाथ बुधवारी, ईतवारी, बोहरा मस्जीद, मिर्ची बाजार, तर उत्तर मध्ये हावडा रेल्वे मार्ग व इतवारी रेल्वे मार्गाच्या संगमापासून आग्नेय दिशेने जाणाऱ्या इतवारी रेल्वे मार्गाने इतवारी रेल्वे मार्गावरील दहीबाजार रेल्वे पुलापर्यंत आहे. पूर्व भागात इतवारी रेल्वे मार्गावरील दहीबाजार रेल्वे पुलापासून दक्षिणेकडे जाणाऱ्या दहीबाजार रस्त्याने मारवाडी चौकापर्यंत व पुढे त्याच रस्त्याने जुना भंडारा रोडवरील जुना मोटार स्टँड चौकापर्यंत तर दक्षिण बाजूला जुना भंडारा रोडवरील जुना मोटार स्टँड चौकापासून पश्चिमेकडे जाणाऱ्या जुन्या भंडारा रस्त्याने श्री. नानजी नागशी यांचे दुकानजवळील इ. पो. क्र. AB/16 पर्यंत. नंतर पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्याने इ. पो. क्र. ab/24 पर्यंत. नंतर पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने इ. पो. क्र. BM/11 पर्यंत. व पुढे जैन दवाखान्या समोरील रस्त्याने इ. पो. क्र. BR/19 पर्यंत नंतर उत्तर दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने जुना भंडारा रोडवरील रामचंद्र येनुरकर तेलवाले (संकटमोचन हनुमान मंदिर) यांच्या दुकानापर्यंत. नंतर पुढे पश्चिमेकडे जाणाऱ्या जुना भंडारा रोडने शहीद चौकापर्यंत व पुढे त्याच रोडने गांजाखेत चौकापर्यंत व पुढे त्याच रोडने भंडारा रोडवरील दीप ज्वेलर्सपर्यंत आहे. पश्चिम भागात जुना भंडारा रोडवरील दीप ज्वेलर्सपासून उत्तरकडे जाणाऱ्या तकीया दिवानशहा हंसापुरी रस्त्याने किदवई रोडपर्यंत, नंतर किंदवई मार्गावरील श्री रमेश गुप्ता यांच्या आटा चक्की समोरील टी-पॉईंट पासुन इ. पो. क्र. टीए/ 6 मार्गे व नंतर इ. पो. क्र. टीएम/10मार्गे उत्तरकडे हंसापुरी शाळेसमोरुन इ.पो. क्र.BT/11 पर्यंत. नंतर पूर्वेकडे इ.पो. क्र. BT/11/B समोरील टी पॉईंट पर्यंत नंतर उत्तरेकडे गणेश मंदिर इ. पो. क्र. DP/66 मार्गे इ. पो. क्र. BT/18/A जवळील टी पॉईंट पर्यंत नंतर उत्तरेकडे इ. पो. क्र.BT/21पर्यंत. नंतर पश्चिमेकडे श्री. नगरारे यांच्या घरासमोरुन वायव्य दिशेने रमाबाई आंबेडकर समाज भवन जवळील इ. पो. क्र. BK/2 पर्यंत नंतर उत्तरकडे इ. पो. क्र. BK/6 पर्यंत पश्चिमीकड इ.पो. क्र. BK/55/C जवळील टी-पॉईंटपर्यंत. नंतर उत्तरेकडे मुंबई-हावडा रेल्वे मार्ग व इतवारी रेल्वेमार्गाच्या संगमापर्यंत आहे.
पक्ष | उमेदवार | विजयीउमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्वादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |