नागपूर मनपा निवडणूक, प्रभाग रचनेवरील आक्षेप, हरकतींवर आज होणार सुनावणी

| Updated on: Feb 21, 2022 | 6:01 AM

नागपूर मनपा निवडणुकीची (Municipal Corporation Election) तयार प्रशासनाकडून केली जात आहे. प्रभाग रचनेत काही बदल झालेत. ज्यांना कुणाला यावर आक्षेप घ्यायचे होते त्यांनी मनपाला कळविले आहे. आक्षेप घेणाऱ्यांना यासाठी बोलाविण्यात आले आहे. त्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना फायनल केली जाईल.

नागपूर मनपा निवडणूक, प्रभाग रचनेवरील आक्षेप, हरकतींवर आज होणार सुनावणी
नागपूर महापालिका
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) शहरात प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय. यापूर्वी चार सदस्यीय प्रभाग होता. यंदा तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे जुन्या प्रभागांत थोडाफार बदल करण्यात आला आहे. एका प्रभागातील भाग दुसऱ्या प्रभागात गेला आहे. या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील हरकतींवर 21 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात (Bachat Bhavan in Collectorate) ही सुनावणी होईल. एक फेब्रुवारी रोजी नव्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. या नव्या रचनेवर चौदा फेब्रुवारीपर्यंत एकूण 132 हरकती व सूचना प्राप्त झाल्या. या हरकती व सूचनांबाबत आज सुनावणी (Hearing on Suggestions) होणार आहे. दुपारी बारा वाजतापासून ही सुनावणी घेण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. पूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत ही सुनावणी चालणार आहे.

प्रभागाबाबत काहींना संभ्रम

नव्या प्रभाग रचनेत काही प्रभागांची बदली झाली. एका प्रभागातील भाग दुसऱ्या प्रभागात गेला. यावर काही नगरसेवकांनी आक्षेप मांडला. हा आक्षेप किती योग्य आहे. त्यावर आज सुनावणी होईल. त्यानंतर त्यात काही किरकोळ बदल केले जाऊ शकतात. प्रभाग रचनेतून काही वस्त्यांची नावे गहाळ झालीत. यामुळं नागरिकांमध्ये आपण नेमके कुठल्या प्रभागात मोडतो, यावरून संभ्रम पसरला आहे.

वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन

प्राप्त झालेल्या 132 हरकती व सूचनाधारकांना नागपूर मनपाकडून सुनावणीस उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी नोटीसनुसार दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आक्षेपकर्त्यांना नोटीस मिळण्यात काही अडचण निर्माण झाली असल्यास त्यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाशी संपर्क करावे, असेही कळविण्यात आले आहे. ही सुनावणी घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे बी . वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान सचिव, (वने) मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या सुनावणीस उपस्थित राहणार आहेत.

Video – संजय राऊतांचा नारायण राणेंवर आरोप, मुख्यमंत्री केव्हा मौन सोडणार?, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष, तीन वर्षांत 211 जणांचा प्राण्यांनी घेतला बळी, एकवीस हजारांच्या वर प्राण्यांनाही गमवावा लागला जीव

महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?