नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात महापालिकेनं कचरा संकलनासाठी QR कोड ची पद्धत सुरु केलीय. प्रायोगिक तत्त्वावर 10 घरात ही पद्धती सुरु करण्यात आल्याचं महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितलंय. नागपूर महापालिकेचा हा प्रयोग यशस्वी होणार का हे पाहावं लागणार आहे.
नागपूर महानगरपालिकेकडून घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सोय करण्यात आलीय. पण गेल्या काही दिवसांत कचऱ्याची गाडी वेळेवर आणि नियमित येत नसल्याची अनेकांची तक्रार होती, यावर समाधान शोधण्यासाठी मनपाने प्रायोगिक तत्त्वावर क्यु आर कोड पद्धती सुरु करण्यात आलीय.
कचरा संकलनासाठी आलेल्या गाडीचा चालक त्या घरातील QR कोड स्कॅन करणार, आणि त्यानंतर कुठल्या घरातून कचरा संकलन झाले, याची माहिती महानगरपालिका प्रशासनाला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 10 घरात याची सुरुवात झालीय. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचं यावेळी महापौर दयाशंक तिवारी यांनी सांगितले. प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेल्या या प्रयोगाला यश आल्यास संपूर्ण नागपूरमध्ये हा प्रयोग राबवला जाण्याची शक्यता आहे.
नागपुरात नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॅाच आहे. नियम तोडणाऱ्या वाहणांचे फोटो सीसीटीव्हीत कैद झाले की लगेच वाहनचालकांच्या मोबाईलवर ई चालान पाठवाला जातो. पण नागपूर पोलिसांच्या या ई चालानला साधारण दीड लाख पेक्षा जास्त वाहनचालकांनी केराची टोपली दाखवलीय.
नागपूर शहरात साधारण ३० टक्के ई चालान भरलेच नाही. ई चालानची थकीत रक्कम सात कोटींच्या आसपास आहे. थकीत दंड वसूल करण्यासाठी आणि बेलगाम वाहनचालकांवर कारवाईसाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी स्मार्ट नाकाबंदी लावलीय. या स्मार्ट नाकाबंदीतून पाच महिन्यात 5 कोटी 70 लांकांचा दंड वसूल झालाय. पण अद्याप साधारण 30 टक्के वाहनचालकांनी ई चालान भरलाच नाही. त्यामुळे बेलगाम वाहनचालकांना ई चालानचा धाक नाही का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
इतर बातम्या:
VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल
वाहतूक पोलिसांच्या ई- चालानचा धाक कमी? दीड लाख वाहनचालकांनी दंड थकवला
Nagpur Municipal Corporation launched QR code scanning system for waster collection said by Dayashankar Tiwari