NMC Election 2022 Ward No 19 | नागपूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 19 मध्ये पुन्हा कमळ फुलणार की करणार कोणी घुसखोरी? काय आहे यंदाचे गणित

| Updated on: Aug 06, 2022 | 1:34 PM

NMC Election Ward No 19 | नागपूर महापालिका हा भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपचे उमेदवार जनतेच्या पसंतीला उतरले होते. या वॉर्डात यापूर्वी चार ही जागा भाजपने राखल्या होत्या.

NMC Election 2022  Ward No 19 | नागपूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 19 मध्ये पुन्हा कमळ फुलणार की करणार कोणी घुसखोरी? काय आहे यंदाचे गणित
भाजप गड राखणार?
Image Credit source: TV9marathi
Follow us on

नागपूर | राज्यातील महापालिका निवडणुकीचे (Municipal election) पडघम वाजत आहे. कोरोनानंतर आणि राज्यातील सध्याच्या सत्ता संघर्षानंतर स्थानिक पातळीवर ही बरीच समीकरणं (local level equation) बदलली आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही पालिका निवडणुकीची दोन वर्षांपासून गोळाबेरीज सुरु आहे. संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी भाजपने (BJP) प्रयत्न चालविले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 तर काँग्रसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. सेना पार चौथ्या स्थानावर होती. आता पालिकेत ऑपेरशन कमळ साठी भाजपतील स्थानिक नेतृत्व सक्रीय झाले आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांवर (Congress Candidate) भाजपचा डोळा आहे. ज्यांचे स्थानिक नेटवर्क तगडे आहे, अशा विरोधी गटातील उमेदवारांना भाजपच्या गोटात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे प्रभार रचनेतील बदलासह उमेदवार बदलाचा ही धक्का काही प्रभागात बसू शकतो. प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी करिष्मा केला होता. हा करिष्मा यंदा टिकवता येईल का? की विरोधी गट दे धक्का देईल हे आता काही दिवसातच समोर येईल.

यावेळी काय होईल?

राज्यातील सत्तांतरणाचे बिन्निचे शिलेदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वातील या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीची रचना, आरक्षण हे मुद्दे पालिका निवडणुकीचे राजकारण तापवल्याशिवाय राहणार नाहीत. नागपूर पालिकेच्या (NMC Election 2022) प्रभाग क्रमांक मध्ये 2022 च्या रचनेप्रमाणे एकूण तीन वॉर्ड येतात. याआधी प्रभाग क्रमांक मध्ये चार वॉर्ड होते. आता नव्या रचनेप्रमाणेत या प्रभागामधील कोणता वॉर्ड आरक्षित झाला आहे? कुणासाठी आरक्षित झाला आहे? प्रभाग क्रमांक 19 मध्ये नेमका कोणकोणता भाग मोडतो, यासोबत या प्रभागातील एकूण लोकसंख्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत किती होती? आता लोकसंख्या वाढीचा काय परिणाम होणार? एक वॉर्ड कमी झाल्याने काय समीकरणं बदलणार, त्याचा फटका कोणाला बसणार या बाबी निवडणुकीचे चित्र नक्की पालटवतील.

2017 साली नागपूर महानगर पालिकेमध्ये भाजपने आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. संख्याबळावर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपनंतर पालिकेच्या रिंगणात काँग्रेस,मग बीएसपी आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेने पालिके स्थान मिळवले होते.

नागपूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 19
प्रभाग क्रमांक 19 मध्ये नेमके किती वॉर्ड? : 3

लोकसंख्येचे गणित काय?

एकूण लोकसंख्या : 48774
अनुसूचीत जाती : 9825
अनुसूचीत जमाती : 3595

प्रभागात कोणता परिसर?

वायुसेवानगर, दाभा, धैर्यशील सोसायटी, कोलबा हाऊसिंग सोसायटी, क्रांतीसूर्यनगर, नर्मदा कॉलनी, वृंदावन कॉलनी, जददीशनगर, सुरतनगर, संतकृपा कॉलनी, हजीरापहाड, अनुशक्तीनगर, साईनगर, आदर्शनगर, गर्व्हमेंट प्रेस सोसायटी, सुरेंद्रगड

 

प्रभाग क्रमांक एकमधील आरक्षण पुढीलप्रमाणे :

प्रभाग क्रमांक 19 अ : अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्रमांक 19 ब : सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 19 क : सर्वसाधारण

2017 साली कोण जिंकलं होतं?

2017 साली प्रभाग क्रमांक 19 मध्ये एकूण चार वॉर्ड होते. त्यात बदल होऊन आता फक्त तीनच वॉर्ड आहेत. त्यामुळे एका नगरसेवकाची गच्छंती निश्चित आहे. त्यातच पक्ष काय धोरण ठरवतो. नवीन लोकसंख्येमुळे होणारे बदल, वॉर्ड रचनेचा परिणाम या सर्वांचा सत्ता समीकरणावर होणार आहे. दरम्यान, 2017 साली प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपचा निर्विवाद वर्चस्व राहिलं होतं. चारही वॉर्डात भाजपचे उमेदवार निवडून आलेले होते. यंदा आरक्षण नवीन समीकरणे घडवू शकते.

2017 साली निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची नावे

प्रभाग क्रमांक 19 अ : संजयकुमरा कृष्णराव बालपांडे, भाजप, मतं 14756

प्रभाग क्रमांक 19 ब : विद्या राजेश कन्हेरे, भाजप, मतं 14937

प्रभाग क्रमांक 19 क : सरला कमलेश नायक, भाजप, मतं 16302

प्रभाग क्रमांक 19 ड : दयाशंकर चंद्रशेखऱ तिवारी, भाजप, मतं 13072

नव्या रचनेप्रमाणे नागपुरात एकूण 156 वॉर्डमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग आहेत. त्यातील 31 प्रभाग अनुसूचित जाती, 12 वॉर्ड अनुसूचित जमाती तर 113 वॉर्ड हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातीच्या 31 पैकी 16 प्रभागात महिलांना, अनुसूचित जमातीच्या 12 पैकी 6 प्रभागांत महिलांना तर सर्वसाधारण प्रवर्गातील 113 पैकी 56 प्रभागात महिलांना आरक्षण देण्यात आलं आहे. 156 पैकी एकूण 78 प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

नागपूर महानगर पालिकेचा निकाल (2017)

एकूण जागा 151

भाजप 108
काँग्रेस 29
बीएसपी 10
शिवसेना 2
राष्ट्रवादी काँग्रेस 1
अपक्ष 1

 

पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष