नागपूर | राज्यातील महापालिका निवडणुकीचा (Municipal election) बिगुल वाजला आहे. कोरोनानंतर आणि राज्यातील सध्याच्या सत्ता संघर्षानंतर स्थानिक पातळीवर ही बरीच समीकरणं (local level equation) बदलली आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही पालिका निवडणुकीची दोन वर्षांपासून गोळाबेरीज सुरु आहे. राज्यातील सत्तांतरणाचे बिन्निचे शिलेदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वातील या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीची रचना, आरक्षण हे मुद्दे पालिका निवडणुकीचे राजकारण तापवल्याशिवाय राहणार नाहीत. नागपूर पालिकेच्या (NMC Election 2022) प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2022 च्या रचनेप्रमाणे एकूण तीन वॉर्ड येतात. याआधी प्रभाग क्रमांक मध्ये चार वॉर्ड होते. आता नव्या रचनेप्रमाणेत या प्रभागामधील कोणता वॉर्ड आरक्षित झाला आहे? कुणासाठी आरक्षित झाला आहे? हे पाहुयात
संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी भाजपने (BJP) प्रयत्न चालविले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 तर काँग्रसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. सेना पार चौथ्या स्थानावर होती. आता पालिकेत ऑपेरशन कमळ साठी भाजपतील स्थानिक नेतृत्व सक्रीय झाले आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांवर (Congress Candidate) भाजपचा डोळा आहे. ज्यांचे स्थानिक नेटवर्क तगडे आहे, अशा विरोधी गटातील उमेदवारांना भाजपच्या गोटात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे प्रभार रचनेतील बदलासह उमेदवार बदलाचा ही धक्का काही प्रभागात बसू शकतो. प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला तर काँग्रेसने एका जागेवर सुरुंग लावला होता.
2017 साली नागपूर महानगर पालिकेमध्ये भाजपने आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. संख्याबळावर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपनंतर पालिकेच्या रिंगणात काँग्रेस,मग बीएसपी आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेने पालिकेत स्थान मिळवले होते.
नागपूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 20
प्रभाग क्रमांक 20 मध्ये नेमके किती वॉर्ड? : 3
एकूण लोकसंख्या : 49388
अनुसूचीत जाती : 10924
अनुसूचीत जमाती : 4406
के. टी. नगर, गिट्टीखदान, आर. बी. आय. कॉलनी, सेमीनरी हिल्स, वैष्णव कॉलनी, तेलंगखेडी, भारतनगर ,रवीनगर, कोलपूरा ब्लॉक क्रं. 18, डब्ल्यु. सी. एल. कॉलनी, सेंट्रल एक्साईज कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, सी. पी. डब्ल्यू. डी. कॉलनी, फ्रेन्डस कॉलनी, जागृती कॉलनी, सुरेंद्रगड, देशराजनगर, वेनुका वासीम कॉलनी, इन्कम टॅक्स कॉलनी
प्रभाग क्रमांक 20 अ : अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्रमांक 20 ब : अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक 20 क : सर्वसाधारण
2017 साली प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकूण चार वॉर्ड होते. त्यात बदल होऊन आता फक्त तीनच वॉर्ड आहेत. त्यामुळे एका नगरसेवकाची गच्छंती निश्चित आहे. त्यातच पक्ष काय धोरण ठरवतो. नवीन लोकसंख्येमुळे होणारे बदल, वॉर्ड रचनेचा परिणाम या सर्वांचा सत्ता समीकरणावर होणार आहे. दरम्यान, 2017 साली प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली होती. परंतू या प्रभागात काँग्रेसने एका जागेवर सुरुंग लावला होता.
प्रभाग क्रमांक 20 अ : शंकुतला पारवे, भाजप, मतं 9245
प्रभाग क्रमांक 20 ब : यशश्री देवराम नंदनवार, भाजप, मतं 11191
प्रभाग क्रमांक 20 क : रमेश गणपती पुणेकर, काँग्रेस, मतं 10110
प्रभाग क्रमांक 20 ड : दिपराज पर्डीकर, भाजप, मतं 5923
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
अपक्ष |