नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अशोक चव्हाणांचं नाव घेत नांदेडच्या राजकारणावर भाष्य केलं. अशोक चव्हाण यांची अवस्था काय आहे ते आता आपल्या सगळ्यांना माहित आहे. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा त्यांची अवस्था पाहिली आहे. पण नांदेड वर माझंच वर्चस्व आहे, हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न ते करत आहेत. अशोक चव्हाण मोठे नेते असल्यामुळे कार्यकर्ते जातात आणि त्यांच्या गळ्यात शेला टाकला जातो. आम्ही आता नांदेडच्या संघटनात्मक बैठका घेऊ आणि ही जे काही बसमध्ये रुमाल टाकून जागा बुक करण्याचा प्रकार आहे, तो बंद करू. विचाराच्या लोकांना पुढे आणू त्यांना आम्ही न्याय देऊ, असं नाना पटोले म्हणाले.
पाच टप्प्यातील निवडणूक सत्तेमध्ये असलेल्या भाजपला दहा वर्षात असलेल्या भाजपच्या काय विकास केला? हे सांगण्यात भाजप अपयशी ठरले आणि त्यांना ते सांगता आलं नाही. भ्रष्टाचार तानाशहा बेरोजगारी महिला शेतकऱ्यांवर अन्याय शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या. यावर राज्यातील मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान भूमिका सुद्धा मांडू शकले नाहीत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
राहुल गांधीने ज्याप्रमाणे कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली. लोकांच्या भावना जाणून घेत पाच गॅरंटीच्या माध्यमातून मांडल्या, हे जनतेने मान्य केलं आहे.नरेंद्र मोदींनी आणि इतर नेत्यांनी जेवढ्या सभा महाराष्ट्रात केल्या. त्याचा कुठलाही प्रभाव झाला नाहीय उलट महाविकासआघाडीला त्याचा फायदा झाला. रोडशोच्या नावाने नरेंद्र मोदींनी मुंबईला वेठीस धरलं होतं. तिथल्या लोकांना तासन् तास त्रास सहन करावा लागला. मेट्रो विमान बंद करून टाकली. या सगळ्या त मुंबईकरांची काय व्यवस्था झाली असेल? त्याचा अंदाज बांधू शकतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोडशोवर पटोलेंनी टीकास्त्र डागलं.
मुंबईचे लोक जमावता आले नाही म्हणून गुजरात मधून लोक आणावी लागली. शिवाजी पार्कवर सभा होती त्याला त्यांना बाहेरून लोकांना आणावे लागले. सगळ्या मतदानाचा विश्लेषण मांडला तर चार टप्प्यात महाविकास आघाडीत मोठ्या संख्येने पुढे आहे. उद्याही महाविकास आघाडीच्या बाजूने कौल राहील. महाराष्ट्रतून भाजप मुक्त महाराष्ट्र हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी गरिबांनी तरुणांनी ठरविलेलं आहे. त्याचा निकाल आपल्याला 4 जून ला पाहायला मिळणार आहे, असंही नाना पटोले म्हणाले.