सुनिल ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 17 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, त्यांची वक्तव्य आणि वाद… हे मागच्या काही दिवसातलं समीकरण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभूरामांबाबत केलेलं वक्तव्य ताजं असतानाच त्यांनी पुन्हा एकदा नवं वक्तव्य केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आव्हाडांनी वक्तव्य केलं. न्यायव्यनस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला. न्यायपालिका सध्या निष्पक्ष राहिलेली नाही. अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो, असं आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने वाद झाला. या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी काल तो विषय मांडला आणि तिथेच संपवला. मी माझी शंका उपस्थित केली. बाबासाहेबांनी काय केले काय नाही. माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हणत नाही. न्यायालयात जातीचा वास येतो असं मी म्हणालो नाही. माझ्या आईला कोणीही पूजेला बोलवत नव्हतं. चातुर्वर्ण्य समजत गेलो. तेव्हा समजलं की आईला पूजेला का बोलवत नाहीत. बाबासाहेबांनी आरक्षण म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलं नव्हतं. ज्यांना शिक्षण, घर नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण आहे, असं आव्हाड म्हणाले.
माझा प्रश्न एवढंच आहे की माझ्यावर ज्या प्रमाणे शिव्या देण्यात येतात,मी साधा प्रश्न विचारला की राम क्षत्रिय होते? राम आमचाच म्हणतो,प्रत्येकाच्या मनात आदराची कल्पना आहे, विपरीत परिस्थितीत लढणारा राम, लंका देणारा राम… विपरीत परिस्थितीत चूप बसणं योग्य असतं. वैचारिक लढाई लढायची नसते,विचार मांडला की आई बहिणीच्या शिव्या मिळतात. ना बोलण्याचे परिणाम भारताला भोगावे लागतील. देश महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारावर बोलत नाही. देशात अबोला झाला आहे. आपले पूर्वज इंग्रजांशी का भांडले तेच कळत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
आम्ही 22 तारखेला अयोध्येला जाणार नाही. 23 ला जाणार नाहीय तर 24 ला दर्शन घेणार आहोत. निमंत्रण कशाला पाहिजे? आम्हाला जेव्हा जायचे तेव्हा जाणार. द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण का दिल नाही?, असंही आव्हाड म्हणाले.
शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले तेंव्हा त्याचे उत्तर काय द्यावे. आज जो हिंदू धर्म दिसत आहे. ते शंकराचार्य मुळे. असं असेल तर तुम्हाला हिंदू धर्म माहीत नाही. आम्ही वैचारिक संघर्ष करायला तयार आहे . 22 जानेवारी काही पूजा पाठ करण्याचा दिवस नाही. अनेक वर्षांपासून रामाच्या नावावर निवडणूक लढली जात आहे, असं आव्हाड म्हणाले.