नागपूर : महाविकास आघाडीने आता जोरदारपणे सभा घेत राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेनंतर आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याआधी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख, आमदार जयंत पाटील यांनीही शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला. सत्तेसाठी ही लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला आहे.
यावेली त्यानी टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार आणि आताचे सत्तेसाठी हाफापले सरकार कसे आहे त्यावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी नागपूरच्या विकासावरून आणि पाणी प्रश्नावरून त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो. मात्र गेल्या आठ वर्षात देशासाठी तुम्ही काय केलं ते सांगा असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.
यावेळी त्यांनी विकास कामांवरून भाजपवर निशाणा साधताना म्हणाले की, आम्ही तुम्हाला सत्ता देतो मात्र तु्म्ही सत्ता असतानाही सामान्य माणसांसाठी तुम्ही काय केला आहे ते आधी सांगा अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.
यावेळी देशासह राज्यातील नागरिकांच्या समस्या काय आहेत. त्यांना कोणत्या अडचणी भेडसावत आहेत. आणि सत्तेसाठी भाजप काय काय अश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करत आहे त्यावरूनही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, तुमच्या गावात उज्वला योजना कितीपर्यंत व्यवस्थित सुरु आहे. पीकविमा योजना व्यवस्थित चालू आहे का? असे प्रश्न उपस्थित करून तुम्हाला कळतंय का तुम्ही कसे फसवले जात आहात? अशा शब्दात भाजपचे राजकारण त्यांनी सांगण्याच प्रयत्न केला.
राज्यात आणि देशात सगळं आलबेल आहे असा भ्रम निर्माण केला जातो आहे. मात्र मोदींचं सरकार येण्याआधी डॉलर, गॅस सिलेंडरचा भाव काय होता? हे आता कुणाच्याही लक्षात नाही? तसेच या सरकारने आनंदाचा शिधा सुरु केला आहे. पण त्यातून मिळालेल्या धान्याला बुरशी लागलेली आहे.
या सरकारमुळे संपूर्ण देश आणि राज्य नासून टाकलं आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर घणाघात केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहे. आता जिंकेपर्यंत थांबायचं नाही. तुमच्यामध्ये वज्रमूठ आवळायची हिंमत होतेय ना? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.
भाजपच्या राजकारणामुळे आता एक-एक मुद्दा समोर येतो आहे. महागाई, बेकारी याचे चटके लागू नये यासाठी धार्मिक भ्रम निर्माण केला जातो आहे.
या बुर्ख्यामागचा बेसूर चेहरा पाहा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, वज्रमूठ सभेसाठी आलेला एकसुद्धा कार्यकर्ता हा भाडखाऊ यामध्ये नाही, एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. त्यामुळे आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही असा थेट इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे.