नागपूर : नागपुरात खाकी वर्दीतली माणुसकीचं नागपूर पोलिसांनी पुन्हा दर्शन घडवलं. नागपूर पोलिसांनी 70 वर्षीय निराधार महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून दिली. शांतीनगरातील नर्मदा बावनकुळेंना पोलिसांनी आधार दिला (Nagpur Police Shows Humanity Put Tadpatri On The Leaking Roof Of 70 Year Old Lady).
गुन्हेगारांवर वचप निर्माण करणाऱ्या नागपूर पोलिसांनी खाकीतल्या माणूसकीचं आदर्श दर्शन घडवलं आहे. नागपुरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी एका 70 वर्षीय निराधार महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून दिली आणि नर्मदा बावनकुळे यांच्या छताची गळती कायमची थांबली. संकटात असलेल्या निराधार आजीला मदत करणाऱ्या नागपूर पोलिसांचं आता सर्वत्र कौतुक होतंय.
पोलिसही माणसंच आहेत. ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने मदत करतात. कधी कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर राहावं लागतं. पण वेळोवेळी पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना घडत असतात. नागपुरातील शांतीनगर परीसरात अशीच एक घटना घडलीये.
शांतीनगर परिसरात नर्मदा बावनकुळे या 70 वर्षीय आजी राहतात. त्यांना कुणाचाही आधार नाही. त्या एकट्याच राहतात. त्यांचं घरही कौलारु घर आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसामुळे त्यांच्या घराचं छत गळत असतं. गुन्हेगारांवर वचप निर्माण करण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांची या निराधार नर्मदा बावनकुळे आजींच्या घराकडे लक्ष गेलं. त्यांचं छत गळत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याच वेळी पोलिसांनी पुढाकार घेत ताडपत्री विकत आणली आणि आजीच्या गळणाऱ्या छतावर टाकली.
पोलिसांच्या या कौतुकास्पद कामामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर नर्मदा बावनकुळे यांनी देखील नागपूर पोलिसांचे आभार मानले आहेत.
याचा एक व्हिडीओ नागपूर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे –
In a humanitarian gesture, on finding an old lady in trouble, the Nagpur Police Zone 3 team helped the 70 yr. old aaji who lives alone, provide a waterproof sheet to fix the leaking roof of her house.#LendingAHelpingHand#NagpurPolice#AlwaysThere4U pic.twitter.com/jW6yRFLXuT
— Nagpur City Police (@NagpurPolice) June 18, 2021
Nagpur Police Shows Humanity Put Tadpatri On The Leaking Roof Of 70 Year Old Lady
संबंधित बातम्या :
सोलापूर वाहतूक पोलिसांची माणुसकी, अपघातात रस्त्यावर पडलेलं 20 लाखांचं सनमाईक स्वत: उचललं
खाकी वर्दीतल्या माणुसकीचं दर्शन, आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला महिन्याचा किराणा वाटप