वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीसोबतच्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केलं. आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यात एक वाक्यता नाही, हे आम्ही सांगत होतो. ते स्पष्ट झालं आहे. यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत. त्यामुळे आम्ही भूमिका घेतली की तुम्ही तुमचा भांडण मिटवा. पण त्याचं भांडण मिटत नाही. त्यांचाच समझोता होत नाही. त्यात आम्ही जाऊन आणखी बिघाड करण्यापेक्षा आम्ही आमची भूमिका घेतली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षांना मी पत्र लिहिलं. सात जागांवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं त्यांना सांगितलं आहे. काही सामाजिक राजकीय स्थिती निर्माण झाली. एकाच विचारांची माणसं एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. समझोता होत आहे आणि जिथे होत नाही. अशा ठिकाणी सुद्धा समोरासमोर आहे. भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. लोक विचारात आहेत. बाहेरची लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात का घेण्यात येत आहेत? आम्ही काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं.
ओबीसींचा लढा त्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आम्ही उमेदवार दिलेल्या चार मतदारसंघात भाजपविरुद्ध वंचित सरळ लढत आहे. मतदार आम्हाला साथ देईल अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला त्याच आम्ही स्वागत करतो. आम्ही सोबत आहोत की नाही हे महत्त्वाचं नाही. त्यांनी त्यांची भूमिका घेतली आहे. एमआयएम आमच्या साठी रुल्ड आउट आहे. काँग्रेसने कोल्हापूर आणि नागपूरमध्ये आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, म्हटलं आम्ही दोन ठिकाणी पाठिंबा दिला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
उमेदवार पळवणं. पक्ष फोडणे सुरू आहे . मनसेला सुद्धा सोबत घेण्याची तयारी सुरू आहे. आपण लढत असलेल्या जागांचा विचार केला तर त्यांना यश मिळू शकते. 2 किंवा 3 जागा वंचित ला देतो, असं सांगितलं जातं होतं. मला राहुल गांधींच्या, काँग्रेस सभेत पाच मिनिटं देण्यात आली. वंचितची ताकत भाजप आणि आरएसएस ला अंगावर घेण्याची ताकत आहे. विस्थापिताना बरोबर घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे असं आमचं मत होतं. मात्र आम्ही इलेक्शनसाठी जी तयारी केली होती. त्यातून आम्ही सगळे मतदारसंघ लढत आहोत. आमचा उमेदवार आम्ही निवडून सुद्धा आणू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.