महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या दौरा करत आहेत. आज ते नागपुरात आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या वरळीतून उमेदवार देणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मी निवडणूक लढवणार आहे. मागच्यावेळी जी गोष्ट केली. वरळीत 37 ते 38 हजार आमचे मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कसे होईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहे. लोक माझ्या हाती सत्ता देतील. भाजप 1952 पासून हेच बोलत होते. 2014 ला त्यांच्या हातात सत्ता आली. वेळ लागतो. लोकसभेची वाफ संपली. आता विषय विधानसभेचा आहे. लोकसभेची वाफ निघाली आहे, असं ते म्हणाले.
लाडकी बहिण योजनेवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. लोकं खूप हुशार आहेत. असे पैसे मिळत असतील तर नक्की घेतील. पण मतदान करती असं नाही. कोणी तरी मला सांगितलं. पण मी चित्र पाहिलं नाही. कोल्हापुरात दरवाजावर पिशवी लावतता जेवढे मतदार तेवढे पैसे ठेवतात. तीनचार पिशव्या असतात. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केलं कसं कळणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
लोक कामं मागत आहेत. ते फुकटचे पैसे मागत नाही. शेतकरी वीज मोफत मागत नाही. त्यांना त्यात खंड नकोय. आता जे पैसे दिले जात आहेत. तो लोकांचा टॅक्स आहे. असं कसं करून चालेल. राज्यात असंख्य जॉब्स आहेत. राज्यातील पोरं इच्छित आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बाहेरच्या राज्यात कळतं की महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षाचे परवाने दिले जात आहे. ही कोणती पद्धत आहे. मध्य प्रदेशात यश मिळालं ते केवळ लाडकी बहीणमुळे नसेल मिळाली. इतरही कारणं असतील ना. पहिला आणि दुसरा महिना कदाचित जाईल. सरकारकडे पैसे कुठे आहेत. अजितदादांनीही सांगितलं निवडून दिलं तरच. पहिल्या हप्त्याची सही असेल, असं राज ठाकरे म्हणाले.
महिलांवरील वाढत्या अत्याचारावर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. मला समजलं नाही. बदलापूरची घटना आहे. आमच्या पक्षाने ती घटना उघड केली. एक घटना घडल्यावर फटाक्याची माळ कशी लागते हे कळलं नाही. खरं तर तुमच्यासाठी ही रोजची बातमी असली पाहिजे. मी आकडेवारी आणली आहे, असं त्यांनी म्हटलं.