नागपूर | 18 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. अशातच जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची चर्चा होतेय. शिवाय काही पक्षांतर होत आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांने सल्ला दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पीसीसी एक्झिक्यूटिव्ह महाराष्ट्रातील सहा विभागामध्ये काँग्रेसच्या बैठकीचा आयोजन करण्यात आलं आहे. पहिली बैठकी नागपूर अमरावतीत होत आहे. काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यासाठी शक्तिशाली बनवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांच आयोजन केलं आहे, असं रमेश चेन्निथला म्हणाले.
मिलिंद देवरा यांच्या पक्षांतराबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राजनीतिक पक्षामध्ये आम्ही पक्ष आणि सत्तेसाठी नाही लढत.. एक आदर्श आणि विचारासाठी आम्ही पक्षात काम करत असतो. पण काही लोकांना पद नसले की ते लोक निघून जातात. जाणाऱ्यांमुळे त्याचा काँग्रेस पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. पण महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून महाराष्ट्रातील नेते इतर पक्षात जाणार नाहीत, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं.
महाविकासच्या जागावाटपावर रमेश चेन्निथला यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या दिवसात कोणाला किती जागा दिल्या जाईल. यावर शिक्कामोर्तब होईल. बऱ्याच ठिकाणी सहमती झालेली आहे. येत्या दिवासात फायनल लवकरात लवकर यादी जाहीर करू. पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये गडचिरोलीमध्ये जाऊन आम्ही बैठक घेणार आहोत. शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस ग्रामीण भागात जात आहोत, असं त्यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अटक झाली आहे. यावरून रमेश चेन्निथला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सीबीआय ईडी याचा दुरुपयोग होत आहे.. कधी भाजपच्या कुठल्या नेत्याच्या घरावर रेड पडली का? हे भाजपमधील कोणाला अटक झाली का? कारण भाजप विरोधकांवर ईडी सीबीआय लाऊन काम करत आहे. यानंतरही या देशातील विपक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी यावेळी सरकार स्थापन करेल, असं ते म्हणाले.