नागपूर : नागपुरात बुधवारी दुपारी भयानक घटना घडली. दाभा परिसरातील सेंटर पॉईंट शाळेतील (Center Point School) ही थरारक घटना आहे. 13 वर्षाची मुलं शाळेच्या मैदानात (School grounds) खेळत होती. अचानक दोघांचा वाद झाला. यात एकाने स्वीस चाकू काढला. दुसऱ्यावर वार केले. यात एक विद्यार्थी जखमी झाला. जखमीच्या पालकांना सांगण्यात आलं. त्यानंतर जखमी विद्यार्थ्याला (injured students) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला तात्पुरते निलंबित करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका परवीन कसाड यांनी सांगितलं.
बुधवारी दुपारी बारा वाजताची वेळ. मधला ब्रेक झाल्यानं विद्यार्थी मैदानावर खेळत होते. दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने स्वीस चाकू काढला. दुसऱ्यावर वार केले. यात तो जखमी झाला. ही घटना दाभा येथील सेंटर पॉईंट स्कूलमध्ये घडली. गिट्टीखदान पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. पण, तक्रार करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक बापू ढेरे म्हणाले, दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गातील आहेत.
जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पालकांना कळविण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुखापत गंभीर नसल्याची माहिती आहे. मुख्याध्यापिका परवीन कसाड म्हणाल्या, हा विषय गंभीर आहे. हल्ला करणाऱ्या मुलाला तात्पुरते निलंबित केले आहे. रुग्णालयाकडून मानकापूर पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.
दाभ्यातील सेंटर पॉईंट ही ख्यातनाम शाळा आहे. अशा शाळेतील विद्यार्थी हे चांगल्या घराण्यातील असतात. त्यांचे पालक मुलांवर लाखो रुपये दरवर्षी खर्च करतात. अशात एका मुलानं शाळेत चाकू आणला. हे त्याच्या पालकांना कसं कळलं नाही. खेळताना त्याच्याकडं चाकू होता, याची भणकही शाळेतील कर्मचाऱ्यांना लागली नाही. या घटनेकडं गांभीर्यानं पाहिलं जात आहे. तुमचा पाल्य शाळेत जात असेल, तर त्याच्याकडं लक्ष ठेवा. कारण विद्यार्थी केव्हा काय करतील, काही सांगता येत नाही.