नागपूर: जिल्ह्यात कोरोना पॅाझिटीव्हीटी 0.2 टक्के आहे. पॅाझिटीव्हीटी रेट कमी असतानाही, नागपूरातील रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान यांच्यासाठी 4 पर्यंतची वेळ देण्यात आलीय. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केलीय. रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान मधील कार्यक्रमाला 4 नंतर जास्त पसंती असते. त्यामुळे वेळ वाढवून मिळावी. अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.
कोरोनाचा संसर्ग फक्त हॅाटेल व्यावसायीकांमुळेच वाढतो का? राज्य सरकारला हा सवाल करत, पुन्हा आंदोलनाचा इशारा नागपुरातील संतप्त हॅाटेलचालकांनील दिलाय. राज्य सरकारनं लॅाकडाऊनचे निर्बंध शिथील करत व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. पण हॅाटेल व्यावसायिकांना यातून डावलण्यात आलं. त्यामुळे नागपूरातील हॅाटेलचालक संतप्त झाले आहेत…
नागपूरात निर्बंध शिथील झालेय, पण हॅाटेल व्यावसायिकांना त्यातून वगळण्यात आलंय. त्यामुळे राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे नागपूरातील हॅाटेल व्यावसायिक नाराज आहेत. राज्य सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारून हॅाटेल चारनंतरंही सुरु ठेवण्याचा इशारा हॅाटेल व्यावसायिकांनी दिलाय.हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजेंदर सिंग रेणू यांनी सरकार व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले तरिही, हॅाटेल व्यावसायिकांसाठी व्यापारी संघर्ष समिती रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने लॅाकडाऊनमध्ये शिथीलता दिलेली आहे. त्याचा फायदा नागपूरातील सलून आणि पार्लर व्यावसायीकांना होणार आहे. दुकानं सुरु ठेवण्याची वेळ रात्री आठपर्यंत वाढवण्यात आलीय. त्यामुळे व्यवसाय वाढेल, असा विश्वास सलून चालकांनी व्यक्त केलाय.
डेल्टा प्लस नागपूरमध्ये कधीही येईल
ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारी, पोलीस, कोरोना याविषयची माध्यमांना माहिती दिली. नागपूर शहर पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त व्हावं आणि नागरिकांचे सहकार्य मिळावं यासाठी पोलिसांची बैठक घेतली, असल्याचं सांगितलं. येणारे सणासुदीचे तीन महिने अत्यंत महत्वाचे आहेत. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात डेल्टाप्लसचे रुग्ण आढळले आहेत. ते कधीही नागपूर पर्यंत पोहचू शकतं त्यामुळे त्यामुळं तिसरी लाट सुरू झालीय खबरदारी घेण्याची गरज असल्याचं नितीन राऊत म्हणाले आहेत. पोलिसांनी दुसऱ्या लाटेत खूप चांगलं काम केलं. दुसऱ्या लाटेत बेड्स मिळाले नाही. आम्ही मंत्री असूनही अनेकदा हतबल होतो. त्यामुळं अनेकांनी आपल्या जवळचे लोकं गमावले. आता संख्या नियंत्रणात असली तरी कोरोना संपलेला नाही, त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे.
इतर बातम्या:
नाशिकमध्ये डेल्टा प्लसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण, नितीन राऊतांचा नागपूरकरांना ‘हा’ इशारा
MPSC सदस्यांच्या नियुक्तीवरुन नवा वाद, आयोगावर फक्त मराठा सदस्य असल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप