लोकसभेला झालं तसं होणार नाही, यंदा मुख्यमंत्री…; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत

| Updated on: Jul 07, 2024 | 7:31 PM

Udya Samnat on Vidhansabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीवरही उदय सामंत यांनी भाष्य केलं. तसंच युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. वाचा...

लोकसभेला झालं तसं होणार नाही, यंदा मुख्यमंत्री...; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत
मंत्री उदय सामंत
Follow us on

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जात उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. या दौऱ्या दरम्यान यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. अनेक वेळा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरेनी पाहणी केलेली आहे. लोकसभेत फेक नॅरेटिव्ह केल्यामुळे त्यांना मतं जास्त मिळाली आहे. मात्र वारंवार तसं होणार नाही. विधानसभेत महायुतीचा सरकार येईल आणि मुख्यमंत्रीही महायुतीचाच होईल, असं उदय सामंत म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?

शिंदे सरकारने नवी योजना आणली आहे. शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीका होत आहे. यालाही उदय सामंतांनी उत्तर दिलं आहे. कुठल्या एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा करणे योग्य नाही. या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील बहिणींना होत आहे. मात्र काही लोकांना पोटशूळ उठलेला आहे, असं सामंत म्हणाले.

महायुतीतील समन्वयावर भाष्य

नारायण राणे आणि सामंत एकत्रितरित्या काम करत आहेत. यामुळे मला वाटत नाही त्यात मनोमिलनाची गरज आहे. आम्ही महायुतीत आहोत. आमच्या दोन कुटुंबात कुठलाही वाद नाही। कोकणाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत चिंता करण्याची गरज नाही, असं म्हणत महायुतीतील समन्वयावर सामंतांनी प्रतिक्रिया दिलीय.

माझ्या मतदारसंघात निलेश राणे यांनी आंदोलन केलं होतं. मी त्यावर लक्ष ठेवून होतो. त्या व्यक्तीकडून जर खरोखरच गुन्हा घडला असेल. तो कुठलाही जातीचा असो त्या त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका घेतलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनीही डिजीला आदेश दिलेले आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातला जाणार नाही, कडक कारवाई होईल. अवैध तस्करी होत असेल आणि ते सापडले तर त्यावर देखील कठोर कारवाई होईल, असंही उदय सामंत म्हणाले.

नागपूरमध्ये एकाच ठिकाणी नाही अनेक ठिकाणी एमआयडीसी होत आहे. भंडारा येथे क्लस्टर तयार होत आहे. नक्षलवादी जिल्हा असलेल्या गडचिरोली आता एक लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. गडचिरोली नक्षलवादी जिल्ह्याची ओळख पासून उद्योग नगरी अशी ओळख तयार होईल, असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय.