नागपूर: महाराष्ट्र सरकारनं कोरोना संसर्गाचा दर आणि रुग्ण संख्या कमी असणाऱ्या 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेक द चैनचे निर्बंध हटवल्यानं छोटे व्यावसायिक, व्यापारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, गेल्या दीड वर्षांपासून व्यवसाय बंद असणाऱ्या बँड पथकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. बँड पथकानं निर्बंध हटवल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
कोरोना आणि लॅाकडाऊनमध्ये छोट्या व्यावसायिकांवर मोठं संकट ओढवलं होतं. जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यात बँड वाल्यांचाही समावेश आहे. पण आता सरकारने निर्बंध शिथील केलेत. त्यामध्ये बँड वाल्यांचा स्पष्टपणे उल्लेख नाही, तरीही आठ वाजेपर्यंत आम्ही व्यवसाय करु शकतो, असं म्हणत नागपूरातील बँडवाले खुश आहेत. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांचे आभार मानत बँड पथकातील सदस्यांनी सुखाचे दिवस समोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली
राज्य सरकारने लॅाकडाऊनमध्ये शिथीलता दिलेली आहे. त्याचा फायदा नागपूरातील सलून आणि पार्लर व्यावसायीकांना होणार आहे. दुकानं सुरु ठेवण्याची वेळ रात्री आठपर्यंत वाढवण्यात आलीय. त्यामुळे व्यवसाय वाढेल, असा विश्वास सलून चालकांनी व्यक्त केलाय.
कोरोनाचा संसर्ग फक्त हॅाटेल व्यावसायीकांमुळेच वाढतो का? राज्य सरकारला हा सवाल करत, पुन्हा आंदोलनाचा इशारा नागपुरातील संतप्त हॅाटेलचालकांनील दिलाय. राज्य सरकारनं लॅाकडाऊनचे निर्बंध शिथील करत व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. पण हॅाटेल व्यावसायिकांना यातून डावलण्यात आलं. त्यामुळे नागपूरातील हॅाटेलचालक संतप्त झाले आहेत…
नागपूरात निर्बंध शिथील झालेय, पण हॅाटेल व्यावसायिकांना त्यातून वगळण्यात आलंय. त्यामुळे राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे नागपूरातील हॅाटेल व्यावसायिक नाराज आहेत. राज्य सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारून हॅाटेल चारनंतरंही सुरु ठेवण्याचा इशारा हॅाटेल व्यावसायिकांनी दिलाय.हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजेंदर सिंग रेणू यांनी सरकार व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले तरिही, हॅाटेल व्यावसायिकांसाठी व्यापारी संघर्ष समिती रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप