नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी महाल परिसरात मोठा हिंसाचार उसळला. एका समाजाच्या जमावाने विशिष्ट समाजाची घरं टार्गेट केल्याचे समोर आले. मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. अनेक वाहनांना आग लावण्यात आली. काही घरं जाळण्याचा प्रयत्न झाला. तर अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचार्याचा विनयभंग करण्यात आला. जवळपास अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यानंतर पोलिसांनी कारवाई सत्र आरंभले. या हिंसेचा मास्टरमाईंड फहीम खान असल्याचे समोर आले. त्यानेच तरुणांची माथी भडकावून 500 लोकांचा मोर्चा पोलीस स्टेशनवर आणला होता. औरंगजेबाचे गोडवे गायले होते. आता याप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहे. या हिंसाचाराचे धोगेदोरे बांगलादेशच नाही तर जम्मू आणि काश्मीरसोबत जोडल्याचे तपासात समोर आले आहे.
फहीमला 21 मार्चपर्यंत कोठडी
पोलिसांनी फहीम खान याला अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरणात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचार्याचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. फहीमला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे.
दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न
राज्याच्या गृहमंत्रालयाने नागपूर हिंसाचार प्रकरणात एक नवीन खुलासा केला आहे. काश्मीरमध्ये जशी दगडफेक करण्यासाठी भाडोत्री माणसं आणली जातात, त्याच धरतीवर नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्न राबवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणात सखोल तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. नागपूर पोलीस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल यांनी संवेदनशील परिसरात दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात केल्याचा दावा केला आहे. तर दंगा नियंत्रक पथकही तैनात केल्याची माहिती दिली.
सय्यद असीम अली रडारवर
नागपूर हिंसाचारानंतर सय्यद असीम अली हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्याच्या हालचालीवरही तपास यंत्रणांची नजर आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती.
नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि एक युट्यूब चॅनेल चालवायचा.औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेला सय्यद असीम अली हा औरंगजेबाचा खूप गुणगान करायचा. 2015 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानावरून कमलेश तिवारी यांची जो जीभ कापेल. त्याला बक्षीस देण्यात येईल याची घोषणा असीम अली यांनी केली होती.
या घोषणेवरून सय्यद असीम अली चांगलाच चर्चेत आला होता. 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये हत्या करण्यात आली होती. दरम्यान तिवारी यांचे हत्याकांडातील आरोपींनी सय्यद असीम अली सोबत संपर्क साधून बक्षिसासाठी संपर्क केला होता. याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळतात नागपूर एटीएसने सय्यद असीम अली ला अटक करून उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिले होते.
या प्रकरणात तो 2024 पर्यंत तुरुंगात होता, जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सहीम खान याचं नाव समोर आल्यानंतर 2019 मध्ये अटक झालेल्या सय्यद असीम अली याच्यावरही तपास यंत्रणांनी आपली नजर रोखली आहे. अशात नागपुरातील सय्यद असीम अली याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर आली आहे.
फहीमचे मालेगाव कनेक्शन
नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानचे मालेगाव कनेक्शन समोर आले आहे. तो 5 महिन्यांपूर्वी मालेगावात आल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधुन मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.