नागपूर : नागपुरी संत्रा जगप्रसिद्ध (World famous) आहे. त्यामुळे त्याची मागणी सर्वत्र आहे. मात्र यावर्षी संत्र्याच्या झाडावर संत्रा लागताच मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होत आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आला आहे. मात्र ही गळ जास्त उष्णतेमुळे होत आहे की नेमकं कारण काय याचा अभ्यास होण्याची गरज आहे. जगप्रसिद्ध नागपुरी संत्रा (Nagpur Orange) या वेळी कमी प्रमाणात येईल आणि महाग होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होतात दिसते. कारण या वर्षी संत्र्याला बार येताच छोटी छोटी संत्रा झाडावरून गळून पडायला लागली. नागपूरसह संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमान (Temperature) वाढलं आहे. त्याचा फरक संत्रावर पडतो आहे का ? असा एक विचार शेतकऱ्यांनाच्या डोक्यात येत आहे.
मात्र ही संत्रा गळती नेमकी कशामुळे होत आहे. याचा अभ्यास करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत. संत्रावर आलेली ही गळती जर अशीच सुरू राहिली तर यामुळे शेतकऱ्यांनाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आधार द्यावं, असंही शेतकरी सांगतात.
नागपूर जिल्ह्यातील संत्रा प्रसिद्ध असल्याने त्याची मागणी मोठी आहे. मात्र संत्रा झाडावर लागताच त्याची गळ झाली तर शेतकऱ्यांनाच नुकसान होणार आहे. त्यामुळं यावर आताच पावलं उचलण्याची गरज आहे. यामागची नेमकी काय कारण आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील, याची कृषी विभागानं माहिती द्यावी. संत्रा उत्पादकांचं नुकसान टाळावं, अशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.