नागपूर : ओंकार तलमले हा कर्जात बुडाला. त्यातून बाहेर कसे पडता येईल. यावर तो उपाय शोधू लागला. कोरोनाचा काळ होता. अनेक बेरोजगार घरी होते. अशावेळी त्याने रोजगाराचे आमिष दाखवले. यात शंभरावर बेरोजगार अडकले गेले. आज नोकरी लागेल, उद्या लागेल, असं करता-करता तीन वर्षे निघून गेले. शेवटी ओंकार विरोधात तक्रारी सुरू झाल्या. पोलिसांनी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. नागपुरातील डबल मर्डरचा सूत्रधार ओंकार तलमले याने १११ बेरोजगारांना कोट्यवधीचा गंडा लावण्याची माहिती पुढे आली आहे. नासात नोकरी लावून देत असल्याची थाप मारुन त्याने बेरोजगारांना गंडा लावला.
नागपुरात रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये नोकरी लाऊन देतो म्हणून आरोपीने बेरोजगारांची ५ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. नागपूर पोलीसांनी तपास सुरु केलाय. ओंकार तलमले कर्जात बुडाला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने नागपुरातील दोन व्यापाऱ्यांच्या हत्येचा कट रचला. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरु आहे, असं नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितलंय.
गेल्या आठवड्यात निरालाकुमार सिंह आणि अंबरीश गोळे या दोन व्यापाऱ्यांची हत्या झाली होती. कोंढाळी फार्महाऊसवर ओंकार तलमले आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचा गेम केला. ओंकारला अटक करण्यात आली. त्यानंतर ओंकारकडून फसवणूक झालेल्यांनी त्याच्याविरोधात तक्रारी केल्या. अश्वीन वानखेडे आणि ओंकार हे दोघेही ढोलताशा पथकात सोबत होते.
रिजनल रिमोट सेंसिग सेंटरमध्ये पदं रिक्त आहेत. त्याठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. दोन लाख रुपये सुरुवातीला मागितले. पदभरतीची माहिती इतर नातेवाईक, मित्रांना सांगितली. इतरांनाही ओंकारने जाळ्यात ओढले. ओंकारवर १११ लोकांनी विश्वास टाकला. त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले. हत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर ओंकारविरोधात तक्रारींची संख्या वाढत गेली. मेल आयडीवर बोगस अपॉइंटमेंट लेटरही पाठवले होते. ओंकारविरोधात आता आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.