नवी दिल्ली : अग्निपथसारख्या योजना आणून केंद्र सरकार खाजगीकरण (Privatization ) करत आहे. त्यामुळे भविष्यात नोकऱ्यांतलं ओबीसी आरक्षण (OBC Federation) टिकणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावरील मंथन ओबीसी महासंघात व्हावं. हे सातवं अधिवेशन आहे. याचं फलित व्हावं. ओबीसी समाज शेतीशी जुडला आहे. या देशात शेतीचं मोठं नुकसान होतंय. आपल्या देशाचा जीडीपी हा शेतीवर अवलंबून आहे. डीपीत देशाचा तिरंगा (National Tricolour) आला पाहिजे. पण जीडीपीचं काय? या देशात शेतकरी आत्महत्या करत असेल, तर भयावह परिस्थिती आहे. शेतीबद्दलची भूमिका या ओबीसी महासंघात चर्चिली जावी. जातिनिहाय जनगणना केली जावी. ही भूमिका या अधिवेशनात महत्त्वाची आहे. यावर ओबीसी महासंघात चर्चा व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नवीन तारीख देण्यात आली. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सध्या तारीख पे तारीख चाललंय. भाजपने महाराष्ट्राचे वाटोळं केलंय. यांच्या हुकूमशाहीमुळे पुढचा काळ महाराष्ट्रासाठी किती घातक ठरणार, हे जनता भोगतेय. आम्ही खाते तरी वाटले होते. आता उपमुख्यमंत्र्यांकडे खाते पण नाही. कुणाचं काय चाचलं यापेक्षा स्वताबद्दल बोलावं. नंतर दुसऱ्याचं काय चाचलं त्याबद्दल बोलावं, असंही नाना पटोले म्हणाले.
सध्या राज्यात संभ्रमाचं वातावरण आहे. विरोधात असतानाही हे आरोप प्रत्यारोप करायचे. आता पण आरोप प्रत्यारोप करतात. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी भाजपला मतदान केलं. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे आहे. या आमदारांवर कारवाईबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहे. पक्षश्रेष्ठींकडं अहवाल आहे. त्याबद्दल मला काही माहीत नसल्यांच नाना पटोले म्हणाले. यासंदर्भात हायकमांड निर्णय घेतली, असंही ते म्हणाले.
नवी दिल्लीत ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. यात नागपूरहून ओबीसींचे पदाधिकारी गेले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, तायवाडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र केलं. ज्या 22 मागण्या इथे मांडल्या, त्या माझ्या क्षमतेनुसार संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहचविणार. मी मुख्यमंत्री असताना ओबीसी हिताचे 22 निर्णय घेतले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पंतप्रधानांना कुठलीही जात नसते. पण, देशाचे पंतप्रधान ओबीसी असल्यानं मी खुश असल्याचं ते म्हणाले.