नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर येथील नेते प्रशांत पवार यांनी पुन्हा एकदा नागपूर मेट्रोच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘नागपूर मेट्रोत पदभरतीचा महाघोटाळा’ ‘ओबीसी, एससी, एनटीच्या उमेदवारांना डावलले’ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. मागासवर्गीय उमेदवाराला महा मेट्रोने डावलले असताना ओबीसी, एससी संघटनेचे नेते गप्प का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. ‘खुल्या वर्गात 357 जागा निश्चित होत असताना 650 उमेदवार’ खुल्या प्रवर्गातून घेतले गेले, असल्याचा दावा प्रशांत पवार यांनी केला. खुल्या प्रवर्गावर मेट्रो प्रशासन मेहरबान का? ‘आरक्षणाच्या धोरणाला मेट्रोकडून तिलांजली’ का देण्यात आलीय, असा सवाल प्रशांत पवार यांनी नागपूर मेट्रो प्रशासनाला केला आहे. तर, मेट्रो प्रशासनानं हे आरोप फेटाळले असून नियमांचं पालन केलं असल्याचं म्हटलं आहे.
नागपूर मेट्रोवर पदभरती महाघोटाळ्याचा गंभीर आरोप लावण्यात आलाय. आरक्षण धोरणाला बगल देऊन, खुल्या प्रवर्गाला 357 जागा असताना ओपनच्या तब्बल 650 जागा भरण्यात आल्याय. तर 2015 ते 2021 या काळातील पदभरतीत ओबीसी, एससी आणि एनटी समाजावर मोठा अन्याय झाल्याचा आरोप, प्रशांत पवार यांनी केलाय.
एससी समाजाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना घेतलेय, एसटीच्या 66 जागा असताना 24 जण घेतलेय, तर ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना घेतलंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केलाय. महा मेट्रोच्या महापदभरती घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
एससी जागा – 132 ( घेतले 42 )
एसटी जागा – 66 ( घेतले 24 )
ओबीसी जागा – 238( घेतले 113 )
इडब्लूएस जागा – 88 ( घेतले 12)
ओपन जागा – 357 ( घेतले -650 )
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते प्रशांत पवार यांनी केलेल्या आरोपांवर नागपूर मेट्रोकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मेट्रोत पदभरती करताना आरक्षणाचे निकष पाळल्याचं नागपूर मेट्रोचे पीआरओ अखिलेश हळवे यांनी सांगितले.
इतर बातम्या:
राहुल गांधींसोबतच्या फोटोची जोरदार चर्चा, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
अमित शाह-शरद पवारांच्या बहुचर्चित भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
NCP Leader Prashant Pawar accused Nagpur Metro Management did scam in recruitment and refuse to follow reservation