नागपूर : नागपूर मेट्रोत पदभरतीमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार यांनी केलाय. नागपूर मेट्रोने आरक्षण धोरणाला बगल देऊन खुल्या प्रवर्गाला 357 जागा असताना प्रत्यक्षात मात्र तब्बल 650 जागा भरण्यात आल्या. तर 2015 ते 2021 या काळातील पदभरतीत ओबीसी, एससी आणि एनटी समाजावर मोठा अन्याय करण्यात आला, असा आरोप प्रशांत पवार यांनी केलाय. ते नागपुरात बोलत होते. (NCP leader Prashant Pawar alleges in Nagpur Metro recruitment administrator appointed open category candidates on the seat of OBC SC NT candidates)
एससी समाजाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले आहे. तर एसटी प्रवर्गाच्या 66 जागा असताना फक्त 24 जणांना सेवेवर घेतलंय. ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना नोकरी देण्यात आली आहे, असं प्रशांत पवार यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे. तसेच या महामेट्रोच्या महापदभरती घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
दरम्यान, प्रशांत पवार यांनी हे गंभीर आरोप केल्यानंतर महा मेट्रोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र प्रशांत पवार यांच्या या आरोपांनतर नागपूर मेट्रोने आरक्षणाच्या धोरणाला तितांजली दिल्याचा सूर तीव्र होत चालला असून नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशांत पवार यांनी दिलेली माहिती
एससी जागा – 132 ( घेतले 42)
एसटी जागा – 66 ( घेतले 24 )
ओबीसी जागा – 238 ( घेतले 113 )
इडब्लूएस जागा – 88 ( घेतले 12)
खुला प्रवर्ग जागा – 357 ( घेतले -650)
दरम्यान, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना नागपूर मेट्रोमधून प्रवास खरण्याची मुभा मेट्रो प्रशासनाने दिली आहे. मेट्रो प्रशासनाने आपल्या सूचनेत “शासकीय आदेशाप्रमाणे आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी/अधिकारी, तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले नागरिक मेट्रो रेलने प्रवास करू शकतात. प्रवास करण्यास पात्र असणाऱ्या प्रवाशांना लसीकरणाच्या दोन मात्रा (डोज) घेतल्याचा पुरावा मेट्रो स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल,” असे म्हटलेले आहे. 15 ऑगस्ट 2021 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
इतर बातम्या :
कोर्टकचेरीनंतर राणेंचा नरमाईचा सूर; मुख्यमंत्र्यांना ‘महाशय’, तर शिवसेनेला ‘विरोधी मित्र’ म्हणाले
MIG -21 Crash : राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 फायटर जेट क्रॅश, पायलट बचावला
महाविद्यालयांना लैंगिक छळ विरोधी माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणं अनिवार्य, यशोमती ठाकूर यांची माहितीhttps://t.co/6EvewsLrRU#YashomatiThakur | #College | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2021
(NCP leader Prashant Pawar alleges in Nagpur Metro recruitment administrator appointed open category candidates on the seat of OBC SC NT candidates)