खनिकर्म महामंडळातील कोल वॉशरीज घोटाळ्याची ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

| Updated on: Jul 03, 2021 | 3:47 PM

खनिकर्म महामंडळातील कोल वॉशरीजमध्ये तब्बल 43 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी. (Mining Tender Process)

खनिकर्म महामंडळातील कोल वॉशरीज घोटाळ्याची ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी
सांकेतिक फोटो
Follow us on

नागपूर: खनिकर्म महामंडळातील कोल वॉशरीजमध्ये तब्बल 43 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केली आहे. भाजप सरकारच्या काळातच हे टेंडर दिल्याने या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (ncp leader prashant pawar demand to probe mining tender process)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिकर्म महामंडळांच्या टेंडर प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. पण नाना पटोले यांनी फक्त काम न दिलेल्या कंपनीवर आक्षेप घेतला होता. तर, प्रशांत पवार यांनी हिंद एनर्जी आणि अरिहंत या दोन कंपन्यांना काम मिळालं असून या कंपन्यांनी 15 लाख टन कोळसा नेल्याचा दावा केला आहे. तसेच हिंद एनर्जीची स्टोरी काढल्यास अनेकजण तुरुंगात जातील. हा मोठा घोटाळा असून या घोटाळ्याची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप सरकारच्या काळातच हे टेंडर दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पटोलेंनी अधिवेशनात घोटाळा उघड करावा

कोल वॅाशरीज घोटाळा मी आधीच काढला होता. नाना पटोले यांनी घोटाळा बाहेर काढलेला नाही. त्यांनी फक्त टेंडरवर आक्षेप घेतला आहे. तसेच ज्या कंपनीला ऑर्डर मिळाली नाही, त्याबाबत पटोले यांनी पत्रं लिहिलं आहे, असं सांगतानाच नाना पटोले यांनी हा घोटाळा आता अधिवेशनात उघड करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आणखी घोटाळा बाहेर काढणार

खनिकर्म महामंडळ कोळशाची प्रत तपासणार आहे. महाजेनको वापरत असलेला कोळसा खनिकर्म महामंडळ तपासते, असं त्यांनी सांगितलं. हा एकूण 43 हजार कोटींचा घोटाळा आहे. पाच ठिकाणी हा घोटाळा झाला आहे. रिजेक्ट कोल विकण्यात अनेकांचं हित होतं. त्यामुळे ज्यांना ऑर्डर मिळाली त्यांची चौकशी करण्यात यावी, असंही ते म्हणाले. तसेच यातील आणखी घोटाळा बाहेर काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (ncp leader prashant pawar demand to probe mining tender process)

 

संबंधित बातम्या:

खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार: सुभाष देसाई

यंदाही मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या विठूरायाची शासकीय पुजा करण्याचा मान विणेकऱ्यांना, चिठ्ठ्या टाकून निवड

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

(ncp leader prashant pawar demand to probe mining tender process)