नागपूरः यंदाचे हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडे अनेक मु्द्दे असल्याने अधिवेशन पहिल्याच दिवसांपासून गाजणार ही शक्यता वर्तवली जात होती. त्याच प्रमाणे पहिल्याच दिवसांपासून वादग्रस्त मुद्दे, छत्रपती शिवाजी महाराज,सीमावाद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेली बैठक आणि त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली अशा अनेक मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी या मुद्यांवरून सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.
आमदार अमोल मिठकरी यांनी सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी सरकारमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नेहमीच बेताल वक्तव्य केली जात आहे.
त्यामुळे त्यांनी थोडा इतिहास जाणून घेऊन महापुरुषांबद्दल बोलावं. त्यामुळेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधीश असणाऱ्या लोकांना त्यांनी पुस्तक भेट देऊन इतिहास जाऊन घ्यावा अशीही विनंती त्यांनी केली.
अमोल मिठकरी यांनी यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आझादीचा अमृत महोत्सव हे त्यांच्याकडून वारंवार म्हटले गेलेल्या वक्तव्याची त्यांना आठवण करून देण्यात आली.
ती यासाठी की सीमावादाची ठिणगी पडल्यानंतर, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत काय चर्चा झाली हे माहिती नसलं तरीही आपल्या राज्यातील एका खासदारा दुसऱ्या राज्यात येऊ दिले जात नाही मग कसली आले आझादी.
कोण म्हणतं आझादी का अमृत महोत्सव असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सीमावाद प्रचंड गाजणार असल्याचे दिसून येत आहे.
आमदार अमोल मिठकरी यांनी अमित शाह यांच्या बैठकीची आठवण करून देत सांगितले की, दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर नेमकी काय चर्चा झाली आहे. हे त्यांनी जाहीर करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. आमच्या राज्यातील एका खासदाराला दुसऱ्या राज्यात जाण्यास मनाई केली जात असेल तर हा लोकशाहीचा अपमान आहे असंही त्यांनी सांगितले.