नागपूरः सीमाप्रश्नावर वेळोवेळी झालेल्या आंदोलनात आणि थेट बेळगावमध्ये येऊन ज्यांनी आंदोलन केले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सीमावादावर बोलताना त्यांनी सीमाप्रश्नाचा सगळा इतिहास सांगितला. मुंबई राज्य अशी रचना होती, तेव्हा पासून ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताची रचना होती. त्या रचनेनुसारच जर बघायचं झालं तर म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे सीमावाद आता आणखी चिघळणार का असा सवार आता उपस्थित होऊ लागला आहे.
कर्नाटक सरकारने सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारने एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असा ठराव पास केला होता, त्याला प्रत्युत्तर देत महाराष्ट्र सरकारनेही कर्नाटक विरोधात ठराव मांडला.
महाराष्ट्र सरकारने ठराव पास केल्यानंतर महाराष्ट्राचा हा ठराव मिळमिळीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली होती.
त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी सीमावादाचा थेट संबंध मुंबई प्रांत असं राज्य होते, त्यानुसार सीमाप्रश्नाचा संबंध जोडला आहे. त्याचमुळे छगन भुजबळ यांनी सांगितले की, पूर्वी मुंबई राज्य होतं, त्यामध्ये म्हैसूर प्रांत होता.
त्यामुळे आता थेट म्हैसूर प्रांतावरच छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. त्यामुळे बेळगावसह म्हैसूर प्रांतसुद्धा महाराष्ट्रात यायला हवा असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आता सीमावादाच्या वर्मावरच घाव घातला आहे.
त्यामुळे छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे आता कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया व्यक्त होते त्याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कानडी भाषिक राहत असल्याने मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे.
त्यामुळेच आमदार छगन भुजबळ यांनी थेट मुंबई राज्य होतं त्यावेळेपासूनचा इतिहास मांडत त्या मुंबई प्रांतामध्ये ज्या प्रमाणे म्हैसूर प्रांताचा भाग होता त्याप्रमाणे म्हैसूर प्रांतही आता महाराष्ट्रात यायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.