वेठबिगारी करण्यासाठी 6 हजार आणि 2 मेंढ्या दिल्या; नंतर अत्याचार एवढा झाला की, मुलगी मरूनच गेली, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गंभीरता सांगितली…

| Updated on: Dec 21, 2022 | 3:56 PM

छगन भुजबळ म्हणाले की, इतकी वर्षे आपण आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतो. तरीही त्यांचा विकास का होत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

वेठबिगारी करण्यासाठी 6 हजार आणि 2 मेंढ्या दिल्या; नंतर अत्याचार एवढा झाला की, मुलगी मरूनच गेली, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गंभीरता सांगितली...
Follow us on

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासूनच विरोधकांकडून अनेक प्रश्नांवरू सरकारला धारेवर धरणार असल्याचे सांगितले जात होते. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून प्रश्न मांडताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी वेठबिगारीवर सवाल उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. वेठबिगारी किती भयानक आणि तिने किती गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे हे सांगताना त्यांनी कातकरी समाजाचे नुकताच घडलेल्या घटनेचे उदाहरण दिले. त्यावेळी सरकारच्या बाजूनेही त्यांच्या मागण्या मान्य करून मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन त्यांना मदत करण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.

यावेळी छगन भुजबळ यांनी चार ते पाच सवालही उपस्थित करून याबाबत सरकार काही उपाय करणार की नाही असा सवाल उपस्थित केला आहे.राष्ट्र

वादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आदिवासी समाजातील कातकरी समाजाचे भीषण वास्तव सांगताना त्यांनी एक उदाहरण दिले. यावेळी ते म्हणाले की, कातकरी समाजातील एका कुटुंबातील मुलींना सहा हजार आणि मेंढ्या देऊन वेठबिगारीसाठी विकत घेण्यात आले.

त्यावेळी त्यातील एका मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्या अत्याचारामध्येच ती मुलगी मृत्यूमुखी पडली. वेठबिगारी करणाऱ्या त्या मुलींमधील एक मुलगी मरण पावल्यानंतरच ही घटना उघडकीस आली. त्यामुळे ही घटना तुम्हा आम्हाला मान खाली घालायला लावणारी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, इतकी वर्षे आपण आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतो. तरीही त्यांचा विकास का होत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

त्यामुळे खर्च करूनही सरकार या प्रकरणी काय कारवाई करणार , दिलेल्या पैशाचा उपयोग होणार आहे का? वेठबिगारी होते त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही असे सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.