गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, असं जयंत पाटील यांनी का म्हटलं..?

| Updated on: Dec 20, 2022 | 10:55 PM

सी. आर. पाटील यांनी गुजरात निवडणुकीत फार महत्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र त्याच सी. आर. पाटील यांच्या मुलीचे पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत होते. मात्र त्यांच्या ग्राम विकास पॅनलला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, असं जयंत पाटील यांनी का म्हटलं..?
Follow us on

नागपूरः गुजरात निवडणूक यशस्वी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा पराभव कोणी केला हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सांगितले. आमदार जयंत पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ज्या सी. आर. पाटील यांनी गुजरात निवडणूक तुम्हाला जिंकून दिली. त्याच नेत्याच्या मुलीच्या पॅनेलचा पराभव करण्यासाठी तुम्ही दोघांनी कंबर कसली अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

जळगाव जिल्ह्यातील सी. आर. पाटील यांच्या कन्येचे पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत होते. मात्र त्यांचे पॅनेलचा पराभव करण्यासाठी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी प्रयत्न केला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

यावेळी त्यांनी सांगितले की, येत्या सहा महिन्याच्या आत तुम्ही घरी नाही गेला तर त्यांचे नाव सी. आर. पाटील नाही असा इशाराही त्यांनी या दोन्ही मंत्र्यांना दिला आहे. त्याच बरोबर सी. आर. पाटील आता तुमचा करेक्ट कार्यक्रमही करणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सी. आर. पाटील यांनी गुजरात निवडणुकीत फार महत्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र त्याच सी. आर. पाटील यांच्या मुलीचे पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत होते. मात्र त्यांच्या ग्राम विकास पॅनलला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या असून त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला 10 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत.

तर लोकानियुक्त सरपंच पदही शरद पाटील यांच्या पॅनलला मिळाले आहे. या सगळ्या घडामोडीत गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी राजकारण करून त्यांना राजकारणात पाडण्याचे काम तुम्ही केले असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.