नागपूरः राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी वादग्रस्त बोलल्याबद्दल काल त्यांचे हिवाळी अधिवेशनामध्ये निलंबन झाले. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार जयंत पाटील यांचे निलंबंन चुकीचे असल्याची टीका सरकारवर केली जात असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये दादा कोंडके यांच्या सिनेमांची नावं असून त्या नावांच्या माध्यमातून सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.
आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर…
‘मला घेऊन चला’ म्हणून ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं!
पण सध्या ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय… pic.twitter.com/sYvv8qm4Pf— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2022
आमदार रोहित पवार यांनी अभिनेता दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या नावांचा वापर करून सरकारवर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. सरकावर ट्विट करताना ते म्हणाले की, राज्यातील ‘आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर, ‘मला घेऊन चला’ म्हणून ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं! पण सध्या ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय…’ असं ट्विट त्यांनी केले आहे.
रोहित पवार यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या दादा कोंडके यांच्या चित्रपटाच्या नावासारखी सध्याची राजकीय परिस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘मला घेऊन चला’ या चित्रपटाचे नाव टाकून त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जाऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यांना हा टोला लगावला आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात जे चाळीस आमदार गेले आहेत. त्यांच्यासाठी हा टोला त्यांनी लगावला आहे.
तर पळवा पळवी करत तुमचं आमचं जमलं म्हणत सोंगाड्याचं राज्य आलं खरं या टोला त्यांनी जसा शिंदे गटाला लगावला आहे, तसाच टोला त्यांनी भाजपलासुद्धा लगावला आहे.
तुमचं आमचं जमलं ही टीका त्यांनी शिंदे आणि भाजप या पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली म्हणून त्यांच्यावर तुमचं आमचं जमलं अशी टीका त्यांनी केली आहे.
ठाकरे गटातून ज्या आमदारांनी बंडखोरी करून मुंबई-सुरत-गुवाहाटी असा प्रवास केला. त्यांना दादा कोंडके यांच्या चित्रपटाच्या भाषेत त्यांनी मला घेऊन चला या चित्रपटाच्या नावानी टोला लगावला आहे.
शिंदे गटाने मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करून महाराष्ट्रात त्यांनी सत्ता स्थापन केली होती. त्या सत्तेला रोहित पवार यांनी सोंगाड्याच राज्य आले म्हटले आहे.
त्यांच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विटही केले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीचा हा वाद आता सोशल मीडियावरही आणि पेटणार असल्याचे दिसून आले.