राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत येणार होताच, पण कधी?; प्रफुल्ल पटेल यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?

| Updated on: Sep 03, 2023 | 12:41 PM

जे नेते आज अजित पवार यांच्या सोबत आले नाहीत, त्यांचा विचार करू नका. चिंता करू नका, जुनी गर्दी कमी होते तेव्हा नवीन आवक होते. आवक अजून सुरू राहणार आहे. कोण येईन हे आजच सांगत नाही, असं सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत येणार होताच, पण कधी?; प्रफुल्ल पटेल यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
praful patel
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 3 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबतच्या झालेल्या नव्या घरोब्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मध्यंतरी तर राष्ट्रवादीने भाजपसोबत कधी कधी आणि कशी कशी बोलणी सुरू केली होती आणि चर्चा कशी फिस्कटली होती याची माहितीही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे एक मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीने महायुतीत जाण्यासाठीची चर्चा 2019 पासून सुरू होती, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पक्ष फुटीची ही वेळ का आली? असा सवाल करतानाच 2019 मध्ये काँग्रेस सोबत युती करून आपले 54 आमदार निवडून आले. त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. मधल्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत हातमिळवणी केली. शिवसेना आपला मित्रपक्ष नव्हता. अचानक काय झालं की राष्ट्रवादीने शिवसेनेला जवळ केले? त्यावेळी हा प्रश्न पडला?, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं होतं

2019 मध्ये शिवसेनेला जवळ आणण्याचे काम केले. शिवसनेचे 56 आमदार आले, राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले. शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं. मग आपल्यालाही अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद घ्या असं आम्ही म्हटलं. आम्हालाही अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे असा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवलां. पण एकही शब्द त्यावेळी बोलले नाही. आम्हाला सत्ता पाहिजे असे नव्हते. फम दोन आमदार कमी असताना 2 वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला तयार नव्हते, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी 2004 मध्ये आम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले असते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष वाढू शकला असता. पण मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. त्यामुळे विकास झाला नाही, विकास थांबला, असंही त्यांनी सांगितलं.

देशमुखांना टोला

आम्ही आमच्या जिल्ह्यात काम केलं म्हणून आमच्या जिल्ह्यात पक्ष वाढला. तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यात काम करा. पक्ष नक्कीच वाढेल. दोन महिन्यांपूर्वी अजितदादा आणि आमच्या मनात वेगळा विचार का आला? ही पाळी का आली? हे तुमच्या मनात प्रश्न असेल, असं ते म्हणाले. ज्या लोकांना आपण ताकद असतो त्या नेत्यांनी सोबतच्या पदाधिकाऱ्यांना मोठं करायचे असते. पण मागील काळत असे झाले नाही याचे दुःख मला आहे, असा टोला त्यांनी अनिल देशमुख यांना नाव न घेता लगावला.

नेहमी त्यागच करायचा का?

नेहमी त्याग राष्ट्रवादी पक्षाने का करायचा? नंबर वन म्हणून आम्ही का नाही राहायचं? असा सवालही त्यांनी केला. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ. त्यात तडजोड नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र जाऊ शकत नाही असा निरोप आला, तेव्हा राज्याच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे म्हंणून शिवसेनेसोबत आम्ही गेलो. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी केला.

विदर्भात राष्ट्रवादी वाढवणार

विदर्भात राष्ट्रवादी पक्ष का वाढला नाही? विदर्भात जागाच घेतल्या नाही. मग पक्ष कसा वाढणार? असा सवाल त्यांनी केला. पण आता मी आश्वासन देतो. आम्ही सोबत आहोत. नागपुरात आणि विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढेल. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. महायुतीत गेलो म्हणून जागा वाढणार नाही असे नाही. उद्याच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यत चांगल्या जागा घेऊन निवडून आणू, असंही ते म्हणाले.