नागपूर : नागपुरात पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने मटकाफोड आंदोलन ( Andolan) केलं. नागपुरात पुरेसं पाणी मिळावं. गेल्या काही वर्षांत पाणी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. नागपुरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्यू कंपनी विरोधात यावेळी राष्ट्रवादीने घोषणाबाजी केलीय. दत्तात्रयनगर (Dattatryanagar) पाण्याच्या टाकीजवळ मटके फोडत राष्ट्रवादीने ओसीडब्यू आणि मनपा प्रशासनाचा (Administration) निषेध केला. काही भागात पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. मटके रिकामेच राहतात. त्यामुळं राष्ट्रवादीच्या वतीनं मटके फोड आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नागपुरात ओसीडब्ल्यू पाणीपुरवठा करते. एकीकडं पाण्याची कमतरता नसल्याचं सांगितलं जातं. तर काही भागात मात्र, पाण्याचा पुरवठा होत नाही. काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होता. त्यामुळं नागरिक संतप्त झालं. मनपा प्रशासक पाण्याचा पुरेसा पुरवठा करा, असे आदेश देतात. पण, ओसीडब्ल्यू पाणीवाटपात दुजाभाव करते, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळंच ओसीडब्ल्यू विरोधात दत्तात्र्यनगर पाण्याच्या टाकीसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मटकेफोड आंदोल करत ओसीडब्ल्यूचा निषेध केला.
पाणी पुरवठा योजनेच्या सिंभोरा हेडवर्क्स येथे महावितरण सिंभोरा विद्यूत फीडरचे मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या नियोजित कामामुळे आज सकाळी 11 ते 5 यावेळात म्हणजे 6 तास अमरावती व बडनेरा या दोन्ही शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अगोदरच दिवसाआड पाणीपुरवठा व पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या नागरिकांना दुरुस्तीच्या कामाचा फटका बसणार आहे. आज नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मजीप्राचे वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय येऊ नये. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी आज कामे केली जाणार आहेत.