नागपूर : नागपुरात आज सकाळी एनआयएची टीम पोहचली. सकाळी-सकाळी छापेमारी सुरू झाली. नेमकं काय घडलं हे कळायला काही मार्ग नव्हता. सतरंजीपुरा परिसर हादरला. या भागातील लोकांनी असं काय केलं, असा त्यांना प्रश्न पडला. आजूबाजूचे लोकं जमा झाले. एकमेकांना विचारपूस करू लागले. त्यानंतर वेगळंच कारण समोर आलं. इथल्या काही जणांनी व्हॉट्सअपवरून संशयास्पद चॅट केलं. त्यावरून ही छापेमारी करण्यात आली. हे व्हॉट्सअप चॅट हे पाकिस्तानशी संबंधित असल्याने खळबळ माजली.
नागपुरात तीन ठिकाणी NIA ची छापेमारी केली. प्रतिबंधित संघटन जाकिर नाइकचे संगटन इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरएफ) शी संबंधित लोकांवर छापेमारीची माहिती आहे. वेगवेगळ्या सीमच्या माध्यमातून पाकिस्तानात संशयास्पद व्हॅाट्सॲप चॅटिंग केल्याची माहिती आहे.
नागपुरातल्या सतरंजीपुरा भागात NIA चा छापा मारला. पाकिस्तानमधील व्यक्तीशी व्हॉट्सअपवरून संशयास्पद चॅट केल्याप्रकरणी चौकशी केली. अख्तर रजा वल्द मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा वल्द मोहम्मद मुक्तार यांची चौकशी केल्याची माहिती आहे.
आज पहाटे 4 वाजता NIA ची टीम सतरंजीपुरा भागात पोहचली. NIA च्या छाप्याने नागपुरात खळबळ उडाली. NIA टीम चौकशी करून परतली. अद्याप कुणाला ताब्यात घेतलं नाही. NIA टीमकडून काही सीम कार्ड ताब्यात घेण्यात आले.
सीमकार्डची तपासणी केल्यानंतर खरोखरचं काय चॅट्स करण्यात आले. यातून काय करायचे होते, याचा तपास चमू करेल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. परंतु, अद्याप कुणालाही ताब्यात घेतले नाही. संशयावरून ही चौकशी करण्यात आली आहे.
संघटन जाकिर नाइकचे संघटन इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरएफ) ही संघटना प्रतिबंधित आहे. या संघटनेची संबंधित लोकांवर छापेमारी करण्यात आली. पोलिसांना संशय आहे की, यांनी पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संशयास्पद चॅटिंग केली. त्यामुळे ही चौकशी करण्यात आली.