नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरच्या महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी सुशासन दिनानिमित्त (Good Governance Day) सल्ला दिलाय. गडकरी म्हणाले, तुम्ही अशी महापालिका तयार करा की, त्यामध्ये नगरसेवक आणि नागरिक यांनी महापालिकेत येण्याची गरज पडणार नाही.
नितीन गडकरी म्हणाले, नागरिकांनी संपूर्ण कामे घरून ऑनलाईन पद्धतीनं केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करा त्यासाठी करावा लागले. कोविड काळात ऑनलाईन पद्धतीनं कामे होऊ शकतात, याची माहिती झाली आहे. कोविड काळात मी केलेली ऑनलाइन भाषण मला उत्पन्न मिळवून देत आहेत. माझी भाषण युट्युबवर बघीतली जात आहेत. त्यातून मला 3 ते 4 लाख रुपये मिळतात, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.
नितीन गडकरी यांनी अटल विहारी वाजपेयी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरी म्हणाले, अटलजी राज्यात येत तेव्हा मी त्यांच्या दौऱ्यात राहत होतो. त्यांना मराठी नाटकं खूप आवडत असत. ते स्वतः हिंदी साहित्याचेही रसिक होते. शेवटच्या माणसांपर्यंत कसं पोहचता येईल, यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा.