MLC election | बावनकुळेंचे गडकरी वाड्यावर कांचनताईंकडून औक्षण; नितीनजींनी दिल्लीवरून केला अभिनंदनाचा फोन

| Updated on: Dec 14, 2021 | 3:46 PM

कांचनताई गडकरी यांनी बावनकुळे यांचे औक्षण करून विजयाबद्दल कौतुक केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून बावनकुळे यांचे अभिनंदन केले.

MLC election | बावनकुळेंचे गडकरी वाड्यावर कांचनताईंकडून औक्षण; नितीनजींनी दिल्लीवरून केला अभिनंदनाचा फोन
Follow us on

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी श्रीमती कांचनताई गडकरी (Kanchantai Gadkari) यांनी बावनकुळे यांचे औक्षण करून विजयाबद्दल कौतुक केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून बावनकुळे यांचे अभिनंदन केले.

बावनकुळेंना पहिल्या पसंतीची 362 मते

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना एकूण 554 मतापैकी पहिल्या पसंतीचे 362 मते मिळाली. 5 मते अवैध ठरली. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे ही मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र (छोटू) भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात होते. 10 डिसेंबरला जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले.

 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले विजयी प्रमाणपत्र

बचत भवन येथे आज सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार टेबलवर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये 554 पैकी 549 मते वैध, तर 5 मते अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. विजयासाठी एकूण वैध मतांपैकी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्याच फेरीत विजयासाठी निश्चित मते प्राप्त केल्याने बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी बावनकुळे यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले.

Nagpur Crime | सात दरोडेखोर तलवारीसह घरात घुसले, गळ्याला चाकू लावला नि सोनं लुटलं!

Maharashtra Vidhan Parishad Election Result: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आले म्हणजे विजय निश्चित? फडणवीस म्हणतात, राजकारणात केमिस्ट्री चालते!

MLC election | ज्या बावनकुळेंच तिकीट कापलं, त्यांच्या विजयावर फडणवीस म्हणतात, हा नेव्हर गो बॅक विजय!