Nagpur Water Supply | नागपुरात 9 जलकुंभांवरून सोमवारी पाणीपुरवठा नाही; कोणता झोन होणार प्रभावित?

| Updated on: Feb 06, 2022 | 1:12 PM

नागपुरात 9 जलकुंभांवरून सोमवारी पाणीपुरवठा नाही; सतरंजीपुरा झोन प्रभावित होणार आहे. 28 तासांचे शट डाऊन असणार आहे.

Nagpur Water Supply | नागपुरात 9 जलकुंभांवरून सोमवारी पाणीपुरवठा नाही; कोणता झोन होणार प्रभावित?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील (Kanhan Water Treatment Plant) मुख्य पाईपलाईनला दोन ठिकाणी मोठे लिकेज झाले. 900 मिमीच्या लाईनवर लिकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया (Millions of liters of water wasted) जात आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन (Shutdown for repairs) घेतलं गेलंय. बाधित भागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं ओसीडब्लू आणि महापालिकेनं आवाहन केलंय. कन्हान नदीच्या केंद्राशी शहराच्या उत्तर पूर्व नागपुरातील जलकुंभाशी नवशे मीमी व्यासाची मुख्य पाईपपाईन जुळलेली आहे. या मुख्य पाईपलाईनमध्ये पिवळी नदीजवळील कामठी रोड आणि आटोमोटिव्ह चौक या दोन्ही ठिकाणी लिकेज निर्माण झाले आहेत. हे लिकेज दुरुस्तीसाठी महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

पाणी जपून वापरा

पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्यानं ओसीडब्ल्यूने अठ्ठावीस तासांचे शटडाऊन हाती घेतले आहे. सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते आठ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजतापर्यंत शटडाऊनची वेळ ठरविण्यात आली आहे. या दुरुस्तीदरम्यान आसीनगर आणि सतरंजीपुरा येथील एकूण नऊ जलकुंभांवरून पाणीपुरवठा होणार नसल्याचं ओसीडब्ल्यूनं कळविलं आहे. या कालावधीदरम्यान टँकरनंही पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.

आसीनगर झोनमधील भाग प्रभावित

आसीनगर झोनमधील इंदोरा, बेझनबाग, बिनाकी – एक, बिनाकी – दोन, बिनाकी -तीन, इंदोरा – दोन आणि सतरंजीपुरा झोनमधील बस्तरवारी एक, दोन, तीन येथून पाणीपुरवठा होणार नसल्याचं ओसीडब्ल्यूनं कळविलं आहे. आठ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजतानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे ओसीब्ल्यूने कळविले आहे.

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

Nagpur | एका सुरेल युगाचा अंत; लतादीदींच्या निधनावर डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला शोक

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता