नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सविस्तर मुलाखत दिली. उत्तर प्रदेश विधानसभा (Uttar Pradesh Assembly) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशात भाजपची लाट आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावर मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) म्हणाले, लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. लाट असती तर उत्तर प्रदेशामध्ये असंतोष दिसला नसता. ही लाट असंतोषाची लाट आहे. बेरोजगारीची लाट आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
ओबीसी आरक्षणावर ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाकडे अहवाल दिला आहे. निर्णय लवकर अपेक्षित आहे. 50 टक्केच्या आतमध्ये कायदा ही केला आहे. आमच्याकडून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे. आम्ही बनविलेल्या कायद्यानुसार निवडणूक घेतल्या जाऊ शकतात. यात काही अडचण दिसत नाही, असंही ते म्हणाले.
खून करणारा साक्षीदार होत असेल आणि निरपराधी असलेल्याला फाशी होत असेल तर काय, असा सवाल मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सचिन वाझे प्रकरणावर ते आज बोलत होते. गुन्हा करणारा फिरत राहील आणि ज्याचा गुन्हा नाही तो दोषी हा अजब न्याय आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. तपास यंत्रणा न भरकटता योग्य न्याय देईल, ही आमची अपेक्षा आहे. जो दोषी असेल त्याला सजा होईल, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. सचिन वाझे हे स्कार्पियो तपासात अडथळा निर्माण करत असल्याचे एटीएसच्या रिपोर्टमधून समोर आलंय. एटीएसचे अधिकारी म्हणतात, संबंधित गाडीबद्दल माहिती पडल्यावर 3 वाजून 50 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचलो. पण तत्पूर्वी सचिन वाझे त्याठिकाणी पोहोचले होते. तसंच तपासांत हस्तक्षेप करीत होते. गाडीचा दरवाजा खोलताच त्यातून एक चिठ्ठी मिळाली. याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवलं. जिलिटिनच्या काड्या मिळाल्याने सर्वांना दूर होण्यास सांगितलं. बॉम्ब शोधक पथकातील व्यक्ती तपास करत असताना वाझे गाडीजवळ जात होते, असंही रिपोर्टमधून समोर आलंय.