नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा स्थापना दिवस म्हणजेच 7 ऑगस्ट… ओबीसी दिवस ‘मंडल दिवस’ म्हणूनही साजरा करण्यात येत आहे. याच दिवशी दिवंगत पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांनी मंडल आयोग लागू केलेला होता. हा दिवस आठवणीत रहावा, याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 6 वे अधिवेशन ऑनलाइन आयोजित केलेले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापना दिनानिमित्त महासंघांचं सहावं अधिवेशन आज नागपुरात ऑनलाईन पद्धतीने पार पडतंय. या अधिवेशनात ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा ठरवण्याबाबत मंथन होणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार ऑनलाईन पद्धतीने या अधिवेशाला हजेरी लावणार आहे. या अधिवेशात पुढील ओबीसी लढ्याची दिशा यावर वडेट्टीवार बोलतील.
या अधिवेशनाचे उद्घाटन ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे जस्टिस व्ही. ईश्वरैय्या, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. हरी ईपन्नापल्ली, माजी आमदार डॉ. नारायण मुंडे, डॉ. अशोक जिवतोडे, दिलीप मंडल, ॲड.एन.टी. राठोड, जी. करुणानिधी, सचिन राजुरकर, डॉ. खुशाल बोपचे, हंसराज जांगिड, जाजुला गौड, जसपालसिंग खिवा, सुभाष घाटे, मधू नाईक, पोथनकर लक्ष्मीनारायण, मंजीत राणा, शाम लेडे, प्रकाश भंगरथ, चेतन शिंदे, रोशन कुंभलकर, सुषमा भड,ॲड.रेखा बाराहाते, श्रीमती. कल्पना मानकर आदी अधिवेशनात सहभागी असणार आहे.
या अधिवेशनात माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या ओबीसी भूषण म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. या ऑनलाईन अधिवेशनात ओबीसी समाज बांधवांनी रजिस्ट्रेशन करुन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(OBC Mahasangha Online session nagpur Vijay Wadettiwar)