सकाळपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसात नागपूरच्या ऐतिहासिक राजभवनचं सौंदर्य आणखीच बहरलंय. या पावसात मोरांचा सुंदर पिसारा आणि नाच पहायला मिळतोय.
शिवाय आकाशातून चित्रीत केलेल्या दृष्यात राजभवन निसर्गाच्या विविधतेनं नटलेलं दिसतेय. तब्बल १३० वर्षे जुनं असलेल्या नागपूरच्या या राजभवनला ऐतिहासिक महत्त्व आहे.
१०० एकरात या राजभवनलचा विस्तार असून, राजभवनच्या अवतीभोवती तब्बल १ लाख झाडं आहे. त्यामुळे एखाद्या जंगलाप्रमाणे नागपूरचं राजभवन दिसतेय. शिवाय या परिसरात असलेले सुंदर लॉन, पावसाळ्यात एखादा हिरवा गालीचा जमिनीवर अंथरल्यासारखे दिसतात.
रिमझिम पावसात नागपूरातील या राजभवनचं सौंदर्य आणखीच बहरलेलं दिसते. राजभवनचे प्रभारी अधिकारी प्रमोद येवले यांनी योग्य नियोजनातून आणि वृक्ष लागवडीतून या राजभवनच्या सौंदर्यात भर घातलीय.