नागपूर : अल्तिया ही मोमीनपुऱ्यात राहणारी पंधरा वर्षांची विद्यार्थिनी. दहाव्या वर्गात शिकत होती. चौदा फेब्रुवारीला अल्तिया शाळेतून घरी आली. अभ्यास करत नव्हती म्हणून तिची आई तिला (angry mother) रागावली. दोघांचाही वाद झाला. हे बोलणं तीनं मनावर घेतलं. आईचं नेहमीचं बोलणं ऐकूण तिला त्रस्त झाल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळं तीनं सायंकाळी विष (Poison taken ) घेतले. त्यामुळं तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारादरम्यान गुरुवारी अल्तियाचा मृत्यू झाला. तहसील पोलिसांनी (Tehsil Police) आकस्मित मृत्यूची नोंद केली. ही मुलगी वयात आली होती. किशोरावस्थेमुळं मुलांच्या शरीरात बरेच बदल होत असतात. त्यामुळं अशावेळी मुलांशी वागताना खूप सांभाळून बोलावे लागते. त्यांना मित्राप्रमाणे वागवावे लागते. अन्यथा ही मुलं घातक पाऊल उचलू शकतात.
दुसऱ्या एका घटनेत, रामेश्वरीतील सुपर बाजारचे संचालकांनी गुरुवारी सकाळी गळफास लावला. भगवाननगर येथील मनोहर महादेवराव बांते असं मृतकाचं नाव आहे. मनोहर हे भगवाननगर येथील हावरापेठ परिसरात राहत होते. ते माजी नगरसेवक शरद बांते यांचे मोठे भाऊ, तर नगरसेविका विशाखा बांते यांचे दिर होते. त्यांचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी शरद बांते यांच्या भाजीचे लग्न होते. त्यामुळे बांते कुटुंब लग्नाला खरबी येथे गेले होते.
शरद बांते यांचा मुलगा सुपर बाजारमध्ये गेला होता. तर मनोहर बांते अकरा वाजतापर्यंत विवाहस्थळी पोहोचणार होते. पण, ते लग्नाला न आल्याने बांते यांनी त्यांना फोन केला. परंतु, फोनवरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सुपर बाजारमधील एका कर्मचार्याला घरी पाठविले. यावेळी हा कर्मचारी घरी पोहोचल्यानंतर घराचे दार आतून बंद होते. त्यानंतर शरद बांते यांच्या मनात शंका वाढत गेली. ते घरी गेले. येथे पोहोचून घराचे दार तोडला. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना मनोहर हे गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.