“श्रद्धा वालकर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढला”; या नेत्याने थेट हिंदू-मुस्लिम संबंध जोडला…

| Updated on: Dec 20, 2022 | 7:54 PM

आशिष शेलार यांनी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळी श्रद्धा वालकरची हत्या झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे तेव्हापासून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढला; या नेत्याने थेट हिंदू-मुस्लिम संबंध जोडला...
Follow us on

नागपूरः हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असतानाच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची लक्षवेधी मांडून या प्रकरणाकडे आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण श्रद्धा वालकरची नोव्हेंबर महिन्यात झालेली हत्या आणि त्यानंतर ते प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहेत.
ज्या श्रद्धा वालकरची दिल्लीत तिच्या प्रियकराने तुकडे तुकडे करून हत्या केली. त्या प्रकरणाची खरं तर सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

आशिष शेलार यांनी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळी श्रद्धा वालकरची हत्या झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे तेव्हापासून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी निर्भया सिंग आणि शक्ती या कायद्यानुसार केली जात आहे. त्यामुळे हस्तक्षेप होऊ शकत नाही. तरीही या प्रकरणात हस्तक्षेप वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात एक महिन्याची दिरंगाई आणि समजूतीच्या प्रकरणातही दिरंगाई केली गेली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे एका विशिष्ट समाजावर अन्याय होत असल्याचे मतही आशिष शेलार यांनी व्यक्त केली गेली आहे.

मागील काही सरकार होती त्याकाळात नेहमीच अशा प्रकरणात दिरंगाई करून हिंदू समाजावर अन्याय करण्यात आला आहे. पालघरमध्ये ज्या साधूंच्या हत्या झाल्या त्यावेळी, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.

मात्र त्यांनी हे प्रकरण विशेष तपास यंत्रणेकडे न देता. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी ज्या प्रकारे साधूंच्या हत्या झाल्यानंतर ज्या प्रमाणे राजकीय हस्तक्षेप झाले त्याच प्रमाणे श्रद्धा वालकर प्रकरणातही हस्तक्षेप वाढत असल्याचा जाहीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.