महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव प्रभा राव! राजस्थान, हिमाचल प्रदेशचं राज्यपालपद भूषविलं होतं

| Updated on: Mar 04, 2022 | 5:45 AM

प्रभा राव यांची आज जयंती. प्रभा राव यांनी देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला होता. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात त्यांनी विविध पदे भूषविली. त्याठिकाणी आपल्या प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटविला.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव प्रभा राव! राजस्थान, हिमाचल प्रदेशचं राज्यपालपद भूषविलं होतं
राजस्थानच्या माजी राज्यपाल प्रभा राव
Image Credit source: पत्रिका न्यूज
Follow us on

प्रभा राव (Prabha Rao) यांचा जन्म 4 मार्च 1935 रोजी झाला. आज प्रभा राव यांची जयंती. मध्यप्रदेशातील खंडवा हे त्यांचे जन्मगाव. स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्यामुळं प्रभा राव यांना बालपणापासूनच राष्ट्रकार्य आणि समाजकार्याचे धडे मिळाले. प्रभा राव या राजकारणी होत्या. त्या राजस्थान आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल होत्या. 13 व्या लोकसभेच्या सदस्य होत्या. प्रभा राव या महाराष्ट्रातील राजकारणात (Politician) सक्रिय होत्या. 1972 साली प्रथम विधानसभेवर (Assembly ) निवडून गेल्या. 1972 ते 1989 तसेच 1995 ते 1999 या कालावधित त्या आमदार होत्या. वर्धा जिल्ह्यातील देवळी हा त्यांचा मतदारसंघ. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जात होता. रणजित कांबळे हे प्रभा राव यांचे भाचे. त्यांचा राजकीय वारसा पुढं चालवताहेत.

प्रशासकीय कौशल्याचा ठसा

1985 ते 1989 तसेच 2004 ते 2008 या कालावधित त्या प्रभा राव या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा होत्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महान व्यक्तिमत्त्व होत्या. प्रभा राव यांनी देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला होता. त्या अतिशय स्पष्टवक्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात त्यांनी विविध पदे भूषविली. त्याठिकाणी आपल्या प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटविला.

काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न

काँग्रेस पक्षाला अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी परिश्रम घेतले. 26 एप्रिल 2010 रोजी ह्रदविकाराच्या झटका आला. जोधपूर हाऊस येथील बाथरूममध्ये पडल्या होत्या. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले. तेथे प्रभा राव यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी त्या राजस्थानच्या राज्यपाल पदावर कार्यरत होत्या. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अंतिम संस्कार वर्धा येथे करण्यात आले.

मेघालयाचे मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष; पी. ए. संगमा यांना आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी का सोडावी लागली?

तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा

समृद्धी महामार्गावर जालन्यात राजेशाही सजावट, पुलावर लक्षवेधी नक्षीकाम, ‘जालना सोने का पालना’ थीम काय ?