नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते (Senior Social Worker) डॉ. प्रकाश आमटे यांनी प्रकृती सध्या बरी आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर दोन-ती दिवसांनी तपासणी केली जाईल. सर्व चाचण्या केल्यानंतर किमो थेरपी (Chemotherapy) सुरू करण्यात येईल. पुढील साधारण महिनाभर पुण्यातच उपचार होतील, अशी पोस्ट प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबूकवर टाकली आली.
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्पाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आहेत. प्रकाश आमटे यांना हेअर सेल ल्युकोमॅनिया (रक्त कर्करोग) असल्याची माहिती आहे. न्यूमोनियाची तक्रार झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनिकेत आमटे यांनी फेसबूकवर पोस्ट टाकली. त्यानुसार, बाबांची तब्येत आज बरी आहे. आज कदाचित डिस्चार्ज मिळेल. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. मग सर्व टेस्ट करून किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. शरीरातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलं आहे. यातून कॅन्सरग्रस्त रक्तपेशी तयार होतात. त्यानंतर ल्युकेमिया निर्माण होतो.
ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झालंय. दुर्मिळ असा ल्युकेमिया हा रक्ताचा कर्करोग झालाय. हा रक्ताशी संबंधित आजार आहे. यात शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते. कॅन्सरच्या पेशी अस्थिमज्जामध्ये (बोन मॅरो)वाढतात. नंतर या पेशी यकृत, ग्रंथी, वृषण व इतर अवयवांत पसरतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास ते जीवघेणे ठरू शकतात.
आठ जून रोजी डॉक्टर प्रकाश आमटे हे पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले होते. त्यावेळी त्यांना ताप आला. शिवाय खोकल्याचा त्रास झाला. खासगी रुग्णालयात तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.