नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकार कोसळले होते.त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद न्यायालयात गेला. त्यानंतर निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर हा वाद आणखी विकोपाला गेला होता. त्यानंतरही राज्यातील काही भागातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतला होता. तर आता विदर्भातील बडे नेतेही अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे नागपूरमधील शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने यांनी सांगितले.
शिवसेनेच्या पक्षप्रवेशाविषयी बोलताना कृपाल तुमाने यांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याने एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन काय असणार हे कळणार आहे.
त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याची वाट एकनाथ शिंदे यांची शिवसेना बघत असल्याचेही कृपाल तुमाने यांनी सांगितले.
विदर्भातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता वेगळ्या पद्धतीने राजकीय डावपेच केले आहेत. शिवधनुष्य यात्राही नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, सिंदखेडा राजा अशा पद्धतीने यात्रा होणार असल्याने या यात्रेकडे आता राज्यातील महत्वाच्या पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
या शिवधनुष्य यात्रेवेळीच विदर्भातील बड्या नेत्यांचे शिवसेना पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे विदर्भातील शिवसेनेकडे राज्याच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले असून कोण कोण नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत ते आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच कळणार आहे.