नागपूर : नीलकंठ रंगारी हे अंबाझरी पोलीस (Ambazari Police) स्टेशन हद्दीत राहतात. नीलकंठ रंगारी हे 68 वर्षीय वृद्ध इलेक्ट्रिक बिल (Electric bill) भरण्यासाठी निघाले होते. पायदळ रस्त्याने जात असताना एक युवक त्यांच्या समोर आला. पुढे मर्डर झाला आहे. पोलिसांची मोठी तपासणी सुरू आहे. तुमच्या जवळ सोन्याचे दागिने असेल तर रुमालमध्ये बांधून खिशात ठेवा. असं त्यांना सांगत असताना आणखी एक आरोपी आला. त्याने सुद्धा त्यांना तेच सांगितलं. आम्ही पोलीस असल्याचं त्यांनी सांगितल्यानं वृद्ध व्यक्तीने एक सोन्याची चैन (Gold chain) आणि दोन अंगठ्या काढल्या. रुमालात ठेवल्या. हे दोघेही मदत करतो म्हणून सांगत त्यांनी हातचालखी करत ते दागिने लंपास केले.
ही घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. यावरून पोलिसांनी आता आरोपीचा शोध सुरू केला, अशी माहिती एसीपी नीलेश पारवे यांनी दिली. समोरच्या माणसाला भांबावून ठेवायचे आणि चोरी करायची अशी चोरीची ही पद्धत इराणी गॅंगची आहे. त्याचप्रमाणे ही घटना घडली. त्यामुळं नागपुरात पुन्हा इराणी गॅंग सक्रिय तर झाली नाही ना, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीनेसुद्धा तपास सुरू करण्यात आलाय.
दारूबंदी, जुगार व ड्रंकन ड्राईव्ह कायदाअंतर्गत चार प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत एक लाख त्रेप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये पाच प्रकरणात पंचेवीस आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ती हजार एकशे बावीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण तडजोड शुल्क ती लाख चार हजार नऊशे रुपये वसूल करण्यात आले.