दुर्गापूरच्या ग्रामपंचायतीमध्ये राडा, गावकऱ्यांनी दारू दुकानाला परवानगी नाकारली

| Updated on: Nov 24, 2021 | 4:44 PM

दुर्गापूर येथे दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत मोठा राडा झाला. मागील ग्रामसभेत दारू दुकानाला परवानगी नाकारल्यानंतरही ग्रामपंचायतीने हा ठराव आजच्या विषयसूचित पुन्हा ठेवला. मात्र ग्रामस्थांनी रुद्रावतार धारण केल्यावर ग्रामपंचायतीला नमते घ्यावे लागले.

दुर्गापूरच्या ग्रामपंचायतीमध्ये राडा, गावकऱ्यांनी दारू दुकानाला परवानगी नाकारली
दुर्गापूर ग्रामपंचायतीत अशाप्रकारे राडा झाला.
Follow us on

चंद्रपूर : शहरालगत दुर्गापूर येथे दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत राडा झाला. मागील ग्रामसभेत दारू दुकानाला परवानगी नाकारल्यानंतरही ग्रामपंचायतीने पुन्हा ठराव आणला. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये देशी दारू दुकान आणि मोबाइल टॉवर नको या मागणीसाठी ग्रामसभेत ग्रामस्थांची एकजूट पाहावयास मिळाली.

दुर्गापूर येथे दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत मोठा राडा झाला. मागील ग्रामसभेत दारू दुकानाला परवानगी नाकारल्यानंतरही ग्रामपंचायतीने हा ठराव आजच्या विषयसूचित पुन्हा ठेवला. मात्र ग्रामस्थांनी रुद्रावतार धारण केल्यावर ग्रामपंचायतीला नमते घ्यावे लागले.

ग्रामपंचायतीचा झाला पराभव

चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर येथे दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत जबरदस्त राडा बघायला मिळाला. दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या मागील ग्रामसभेत या दारू दुकानाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही आजच्या विषयसूचित ग्रामपंचायतीने हा ठराव अगदी दुसऱ्या क्रमांकावर ठेवला. दुर्गापूरच्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये देशी दारू दुकान आणि मोबाइल टॉवर नको या मागणीसाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनोखी एकजूट दाखविली. ग्रामस्थांनी या विषयासंदर्भात संतप्त भूमिका घेतली. नागरिक आणि यंत्रणा यांच्यात हमरीतुमरी झाल्यावर सभेत पोलिसांना पाचारण करण्यात आले. तब्बल पाच तास चाललेल्या ग्रामसभेत अखेर ग्रामस्थांचा विजय झाला. वीज-रस्ते-पाणी- स्वच्छता या ऐवजी दारू दुकान आणि मोबाइल टॉवरला अनुकूलता असणाऱ्या ग्रामपंचायतीचा पराभव झाला.

मोबाईल टॉवरही नको

एकीकडे दुर्गापूर परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तर दुसरीकडे यावर मार्ग काढत विकासकामे अजेंड्यावर ठेवण्याऐवजी ग्रामपंचायतीने भलताच प्राधान्यक्रम ठरविला. मंगळवारच्या सभेत मात्र दारू दुकान आणि मोबाइल टॉवर नको यावर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती दुर्गापूरच्या सरपंच पूजा मानकर यांनी दिली. जिल्ह्यात केवळ दुर्गापूरच नव्हे तर ब्रह्मपुरी- सावली -व्याहाड -गडचांदूर व ऊर्जानगर येथेही अशाच पद्धतीने दारू दुकानांना स्थानिकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. यातून कोण व कसा मार्ग काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वाघांचे दात विकणे आहे! उमरेडमध्ये पाच आरोपी जेरबंद, वनविभागानं रचला सापळा

Vedio छोटू भोयर यांना भोवणार राष्ट्रवादी, शिवसेनेची नाराजी?, राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची वरिष्ठांच्या आदेशाकडे नजर