नागपूर : 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचे उदघाटन (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्स्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून 22 तारखेला शासकीय सुट्टी घोषित केली आहे. या निमित्ताने नागपूर मेट्रो देखील आपल्या प्रवाश्यांना खास भेट देऊन हा उत्सव साजरा करणार आहे. नागपूर मेट्रो तर्फे 22 जानेवारीला प्रवाश्यांना तिकिटावर 30 टक्के सुट मिळणार आहे.
उद्या उयोध्येतील राम मंदिर उद्घाटनानिमीत्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरीकांना सहभागी होता यावे, तसेच शहरातील एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करता यावा यासाठी नागपूर मेट्रोने तिकीट दरात सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरकरांनी याचा फायदा घेत कार्यक्रमात सहभागी होण्याकरता नागपूर मेट्रोचा वापर करावा हे आवाहन नागपूर मेट्रो करीत आहे. मेट्रोने घेतलेल्या या निर्णयाचे नागपूरकरांनीही स्वागत केले आहे.
उद्या राम मंदिराचा उद्घाटनाचा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. या निमित्त देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोट्यावधी राम भक्तांचे राम मंदिराचे स्वप्न उद्या पूर्ण होणार आहे. यानिमीत्त प्रत्त्येकाने घरी दिवे लावून हा उत्सव साजरा करावा असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी उद्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत जाणार आहेत.
मुंबईची ओळख असलेल्या मुंबईचा डबेवाला देखील उद्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा करणार आहे. संस्थेतर्फे अनेक धार्मिक कार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वारकरी पंथाचे पाईक असलेले मुंबईचा डबेवाला संस्थेचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. श्री राम मंदिर उभारणी आणि त्यामागील सुमारे पाचशे वर्षांची अखंड संघर्षाची परंपरा आणि न्यायालयीन प्रक्रिया पाहाता हा तमाम हिंदूसाठी आनंदाचा क्षण आहे असं संघटनेचं म्हणणे आहे. वारकरी सांप्रादायाचे पाईक असलेल्या मुंबई डबेवाल्यांच्या वतीने सोमवारी सकाळी 7 वाजेपासून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून माहिम येथे पूरातन काशी विश्वनाथ मंदिरात सकाळी महाआरती, कलशपूजन, शोभायात्रा, तसेच दिंडी सोहळा आणि पालखी मिरवणूक काढून भजन आणि सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे.