नागपूर: कोरोनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ॲानलाईन परिक्षा घेतल्या होत्या. बीए प्रथम वर्षांच्या मुलांनी परिक्षाही दिली होती.मात्र, निकालामध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परिक्षेत अनुपस्थित दाखवण्यात आलं होतं. परिक्षा देऊनही अनुपस्थित दाखवल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढलंय. याबाबतच्या 300 पेक्षा जास्त तक्रारी नागपूर विद्यापीठाच्या परिक्षा विभागाकडे आल्यात. तर, विद्यापीठानं विद्यार्थ्यांचं कोणतेही नुकसान होणार नसल्याचं सांगितलंय. विद्यार्थ्यांना अनुपस्थित का दाखवण्यात आलंय याचं कारणही परीक्षा विभागानं सांगितलं आहे.
“ॲानलाईन परिक्षा देताना प्रत्येक प्रश्न सेव्ह न केल्याने, परिक्षा देताना सोशल माध्यमांच्या आलेल्या नोटीफीकेशनमुळे विद्यार्थ्यांचे पेपर ब्लॅाक झाले. त्यामुळे अनुपस्थित दाखवल्यांचं विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने सांगितलंय. या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या परीक्षा विभागाच्या चूकीमुळे विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं होतं. विद्यापीठाची परिक्षा देऊनही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुपस्थित असल्याचा उल्लेख असल्यानं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. बीए अभ्यासक्रमाच्या 300 च्या वर तक्रारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडं दाखल झाल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात यंदा सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. परीक्षांचं आयोजन करण्याच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. त्यामुळे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यंदाच्या विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केल्या जातील असं सांगितलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरनं दोन महिन्यांपूर्वी बीए प्रथम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या वतीनं विविध परीक्षांचे निकाल 2 ऑगस्टला जाहीर करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये अनुपस्थित दाखवल्यानं विद्यार्थ्यांना धक्काचं बसला आहे.
इतर बातम्या:
नागपूर महापालिकेच्या परिवहन सभापती बंटी कुकडे बिनविरोध, भाजपकडून दुसऱ्यांदा संधी
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University exam department said students will get relief