नागपूर: ओबीसींच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 वसतिगृह बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तीन वर्षे झाली. या आश्वासनाचं काय झालं? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हा सवाल केला. ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे. 2018 मध्ये ओबीसींसाठी 36 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी यांनी या वसतिगृहाची घोषणा केली होती. मात्र, तीन वर्षे होत आले तरी वसतिगृहासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. वसतिगृहाची घोषणा हवेतच विरली आहे. या आश्वासनाचं काय झालं?, असा सवाल तायवाडे यांनी केला आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे. एका महिन्यात ओबीसींचे वसतिगृह बांधण्यास सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तायवाडे यांनी दिला आहे. राज्य सरकार ओबीसींच्या बाबतीत फक्त आश्वासनं देतं. काम काही करत नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह तयार झालेत, मग ओबीसींचे का नाही?, असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत ओबीसी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. दोन वर्षांत ओबीसी समाजाला सरकारकडून काहीही मिळालं नाही, वसतिगृहाचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय केवळ कागदावरच राहिला आहे, असं ते म्हणाले. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)
Video | Ngapur | मराठा समाजाचे वसतिगृह झालेत, मग ओबीसींचे का नाही?, बबनराव तायवाडे यांचा सरकारला सवाल #Maharashtra #OBC #DrBabanraoTaywade #OBC_Leader #Hostels
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/wfVNga9L6H
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
संबंधित बातम्या:
ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, ‘नरेंद्र’ यांच्या हातावर ‘देवेन्द्र’ टॅटू
VIDEO: शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू
(rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)